Home /News /mumbai /

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात राज्यात गेला 2 जणांचा बळी, कोट्यवधींचं नुकसान

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात राज्यात गेला 2 जणांचा बळी, कोट्यवधींचं नुकसान

रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

    मुंबई 3 जून: निसर्ग चक्रीवादळाने राज्यात दोन जणांचा बळी घेतला. निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबाग मध्ये गेलाय. अलिबाग मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. जोराच्या वाऱ्यांमुळे वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयत नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला. वाहागव,तालुका खेड या भागातील गावात तानाजी अनंता नवले व नारायण अनंता नवले यांचे घर आजच्या वादळात उडाल्याने त्यांचे आई मंजाबाई अनंता नवले वय 65 यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरातील 5 माणसे जखमी झाली आहेत. यामध्ये नारायण नवले वय 45 यांना चाकणमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तानाजी अंनाता नवले व घरातील इतर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात आज कोणतीही प्रगती झाली नसल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेनं नोंदवलं आहे. मान्सूनचा प्रवास हा आजवर खरंतर नियोजित वेळापञकानुसारच सुरू होता. पण काल अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने हवेतील सगळी आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सूनच्या प्रवासात तात्पुरता अडथळा निर्माण झाला आहे. हे वाचा -निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात आज कोणतीही प्रगती नाही - हवामान विभाग मान्सून खरंतर 1 जूनलाच केरळच्या किनारपट्टीवर येऊन धडकला आहे. त्याचा यापुढचा प्रवासही अगदी कालपर्यंत योग्य आणि नियोजित वेळेनुसारच कर्नाटकच्या दिशेनेच सुरू होता, पण मध्येच अरबी समुद्रात निसर्ग हे चक्रीवादळ निर्माण झालं आणि ते आज किनारपट्टीच्या दिशेने ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने धडकलं आणि मान्सूनचं सगळं गणितच बिघडून गेलंय. हेही वाचा - धक्कादायक: गोव्यातल्या वास्को इथं एकाच भागात सापडले 41 पॉझिटिव्ह रुग्ण मोदी सरकारने  शेतकऱ्यांसाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय, 5 दशकांची मागणी पूर्ण
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cyclone, Mumbai

    पुढील बातम्या