नवी दिल्ली, 27 जुलै : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कधी कशावर चर्चा, वाद होतील सांगू शकत नाहीत. सध्या असाच एक शूझ म्हणजे शूझचा फोटो व्हायरल होतो आहे. ज्याचा रंगामुळे सर्वांचा गोंधळ उडाला आहे. या शूझचा नेमका रंग कोणता यावर चर्चा सुरू आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण प्रत्येकाची उत्तरं मात्र वेगवेगळी आहेत. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. यात काहीतरी शोधण्याचं किंवा योग्य उत्तर देण्याचं चॅलेंज असतं. या बुटाचा फोटोही अशा ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोपैकी एक. ज्यात या बुटाचा रंग प्रत्येकाला वेगवेगळा दिसतो आहे. फोटो पाहिल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. फोटोत तुम्ही पाहाल तर एका हातात धरलेला हा शूझ. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो गेल्या वर्षी जानेवारीमध्ये इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये हा शू मिंट आणि ग्रे आहे की पिंक आणि व्हाईट आहे? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. अंधांच्या डोळ्यासमोर खरंच अंधार अंधार असतो? त्यांना नेमकं काय दिसतं पाहा हा VIDEO @opticalillusionss इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शूझचा फोटो पाहून त्यावर विचारलेल्या प्रश्नावर बऱ्याच कमेंट येत आहेत. लोकांना यावर वेगवेगळे कलर दिसत आहेत. काहींनी मिंट आणि ग्रे तर काहींनी पिंक आणि व्हाईट कलर दिसल्याचं म्हटलं आहे. काहींना तर याशिवायही वेगवेळे कलर दिसले आहेत. त्यांनी ग्रीन, ग्रे आणि पिंक रंग दिसत असल्याचं सांगितलं आहे. तर एकाने फक्त ग्रे असल्याच म्हटलं आहे. एका युझरने तर लाइट काढला तर तो फक्त पांढरा आहे आणि कापड गुलाबी आहे, असं सांगितलं आहे.
आता तुम्हाला हा शूझ कोणत्या रंगाचा दिसतो आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.