जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अंधांच्या डोळ्यासमोर खरंच अंधार अंधार असतो? त्यांना नेमकं काय दिसतं पाहा हा VIDEO

अंधांच्या डोळ्यासमोर खरंच अंधार अंधार असतो? त्यांना नेमकं काय दिसतं पाहा हा VIDEO

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अंधांना नेमकं काय आणि कसं दिसतं, हे त्यांच्याच नजरेतून पाहता येईल, असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जुलै : दृष्टी गेली की अंधांना डोळ्यासमोर फक्त अंधार अंधार दिसतो, असं म्हणतात. पण खरंच अंधांना काहीच दिसत नाही का? त्यांना कसं दिसत असेल, काय दिसत असेल असा प्रश्न आपल्यालाही पडतो. अंधांना नेमकं काय आणि कसं दिसत असेल हे पाहण्यासाठी आपण आपले डोळे बंद करतो, तेव्हा आपल्याला अंधारच दिसतो आणि काहीच दिसत नसल्याने आपला जीव एकमद कासावीस होतो. मग ते अंध आयुष्यभर असे अंधारात कसे राहत असतील, असा प्रश्न पडतो. आता अंधांना नेमकं काय दिसतं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अंधांना पाहिल्यावर त्यांना काहीच दिसत नसावं, त्यांचं जग अंधारमय झालं असावं असं वाटतं. पण खरंतर तसं नाही. तुम्ही पाहिलं असेल अंध म्हणजे त्यांचे पूर्ण डोळे बंद असतात असं नाही. काही अंधांचे डोळे किंचितसे उघडे असतात. काहींचे डोळे उघडे असतात, पण त्यात काहीतरी समस्या असते. मग खरंच त्यांना आपण डोळे बंद करून पाहतो तसाच अंधार दिसतो का? तर यासाठी हा व्हिडीओ पाहा. जो तुम्हाला अंधांच्या नजरेतून जग दाखवले. त्यांना नेमकं काय आणि कसं दिसतं हे तुम्हीही पाहू शकाल.

News18लोकमत
News18लोकमत

काही व्यक्ती जन्मापासूनच अंध असतात, तर काहींना काही समस्या किंवा आजारामुळे आपली दृष्टी गमवावी लागते. त्यामुळे अंधत्व वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि त्यांच्या दृष्टीतून दिसणारं जगही वेगवेगळं असतं. एका व्यक्तीने व्हिडीओतून हा फरक दाखवला आहे. ही छोटी छोटी झाडं त्सुनामी-चक्रीवादळापासून तुम्हाला वाचवतील; वनाधिकाऱ्याने शेअर केला VIDEO माईक मुलिगन असं या व्यक्तीचं नाव. त्याचं सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर ब्लिंडनथेमोव्ह नावाचं अकाऊंट आहे. यावर त्याने व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात अंध जग कसे पाहू शकतात हे दाखवलं आहे. त्याने व्हिडीओत सांगितल्यानुसार जगातील केवळ काही टक्के अंधांना काहीच दिसत नाही. पण सर्वांनाच दिसत नाही, असा गैरसमज आहे. खरंतर निम्म्याहून अधिक लोक काही प्रमाणत पाहू शकतात. काहींना गोष्टी अस्पष्ट दिसतात, तर काहींना जगाचा एक बिंदू दिसतो. आता अंधांना नेमकं काय, कसं दिसतं हे दाखवण्यासाठी माईकने वेगवेगळे चष्मे वापरले आहेत. त्यात डोळ्यांची वेगवेगळ्या समस्या असलेल्यांना कसं दिसतं हे दाखवलं आहे. चुकून दरवाजा लॉक झाला तर काळजी करु नका, एक फुगा करेल तुम्हाला मदत कसं? पाहा Video हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी या माहितीबद्दल माईकचे आभार मानले आहेत. दृष्टीची समस्या असलेल्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. तर एकाने आपले डोळे ठिक आहेत, याबाबत आपण भाग्यवान असल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

या व्हिडीओवरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात