जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video: कुत्र्याला जिवंत गिळणार अजगर, इतक्यात असं काही घडलं, पाहून अंगावर येईल शहारा

Video: कुत्र्याला जिवंत गिळणार अजगर, इतक्यात असं काही घडलं, पाहून अंगावर येईल शहारा

Viral Video

Viral Video

जंगलामध्ये अजगराने कुत्र्याला टार्गेट केलं आहे आणि त्याला विळखा घालून तो बसला आहे. हे दृश्य खरोखरं खूप भीतीदायक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई ११ नोव्हेंबर : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी माहितीसंदर्भातील व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात असे ही काही लोक आहेत, ज्यांना वाईल्ड लाईफ संदर्भात व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा वाईल्ड लाईफ संदर्भातील आहे. हा व्हिडीओ अजगर आणि कुत्र्याच्या संदर्भात आहे. जो पाहाताना काही वेळासाठी तुमचा श्वास थांबेल. हे ही वाचा : Watch Video : डान्स करताना चिमुकलीसोबत असं काही घडलं की पाहून येईल हसू हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सने या व्हिडीओला लाईक आणि शेअक केलं आहे. खरंतर जंगलामध्ये अजगराने कुत्र्याला टार्गेट केलं आहे आणि त्याला विळखा घालून तो बसला आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, अजगराने पूर्णपणे कुत्र्याला आपल्या कन्ट्रोलमध्ये केलं आहे. हा कुत्रा या अजगराच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू ते काही शक्य होत नाही. अखेर कुत्र्याची मदत करण्यासाठी काही लोक तेथे पोहोचतात. एक व्यक्ती काठीच्या सह्याने कुत्र्याला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतो. पण तो अजगर काही आपली पकड सोडायला मागत नाही.

    हा व्हिडीओ पाहाता आधी असंच वाटत असतं की आता या कुत्र्याचा जीव वाचने काही शक्य नाही… पण तेवढ्यात तेथे उभा असलेला व्यक्तीने या अजगराचं तोंड पकडलं आणि त्याला मागे ओढलं, ज्यानंतर या अजगराची कुत्र्यावरील पकड सैल झाली आणि थोड्याच प्रयत्नात कुत्रा अजगाच्या तावडीने सुटतो. हा व्हिडीओ खरोखरंच खूप रोमांचक आहे. कारण कुठल्या क्षणी काय होईल, हे कोणालाही माहित नव्हते. पण अखेर कुत्र्याचे प्राण वाचले आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    हा व्हिडीओ Flash (HOREE LAL) नावाच्या युट्यूब अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो अनेकांना आवडला आहे. अनेकांनी आपल्या अकाउंटला देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात