जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Watch Video : डान्स करताना चिमुकलीसोबत असं काही घडलं की पाहून येईल हसू

Watch Video : डान्स करताना चिमुकलीसोबत असं काही घडलं की पाहून येईल हसू

Viral Video

Viral Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली रील्स बनवत आहे. ती नोरा फतेहीच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना तिचा डान्स फसतो, हा व्हिडीओ खूपच मजेदार

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 नोव्हेंबर : सोशल मीडीयाचं वेड सगळ्यांनाच लागलं आहे. तरुण-तरुणी तुम्हाला सोशल मीडियासाठी डान्स करताना किंवा व्हिडीओ करताने अनेकदा दिसले असतील. परंतु लहान मुलांना देखील हा मोह आवरत नाही आणि मग ते ही लागतात आपआपल्या परीने कामाला. तुम्ही येथे लहान मुलांचे देखील अनेक मनोरंजक किंवा डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ काही वेगळाच आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली रील्स बनवत आहे. ज्यामध्ये ती नोरा फतेहीच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसत आहे. नोरा फतेही बॉलिवूडमधली बहुचर्चीत अभिनेत्री तर आहेच. शिवाय ती एक उत्तम डान्सर देखील आहे. तुम्ही तिचे डान्स मुव्हस अनेकदा पाहिले असणार, ज्यामध्ये ती अप्रतीम डान्स करता दिसते. हे हा पाहा : रस्ता दुर्घटनेचा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा, भरधाव कार ट्रकच्या मागे गेली आणि… नोरा सारखं डान्स करण्याची अनेकांची इच्छा असते, पण प्रत्येकाला ते जमत नाही. असं असलं तरी देखील एका चिमुकलीने नोराच्या साकी साकी गाण्यावर डान्स करण्याचे ठरवले. तिने डान्सची पूर्ण तयारी केली, पण तिचा प्लान मात्र फसला. ही चिमुकली आपल्या ज्या स्टाईलने येते, तिची स्टाईल लोकांना आवडली आहे. त्यामुळेच तर डान्स करताना ती पडते आणि तिचा रील्स फसतो, पण तरी देखील लोकांना हा व्हिडीओ पाहायला आवडत आहे.

जाहिरात

नक्की काय घडलं? या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही चिमुकली आपल्या स्वॅग स्टाईलने येते आणि मग सगळ्यांना चलो डान्स करते है, असं म्हणते. या नंतर ही चिमुकली स्वत:च्या तोंडाने साकी-साकी गाणं म्हणते आणि नाचू लागते. पण त्यानंतर ती गोल फिरते आणि तोल जाऊन पडते.

News18लोकमत
News18लोकमत

तिची ही स्टाईल सगळ्यांनाच फार आवडली आहे. हा व्हिडीओ pahari_banka नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला comedyclub__1 नावाच्या अकाउंटवरुन पुन्हा रिशेअर करण्यात आलं आहे. लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. तर अनेकांनी यावर मजेदार कमेंट देखील केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात