जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर ती पाणी पित बसली आणि भरधाव वेगानं आली कार, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, Video Viral

रस्त्यावर ती पाणी पित बसली आणि भरधाव वेगानं आली कार, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

धावत्या गाडीचा नुसता धक्का लागला तरी एखाद्याचा जीव जाऊ शकतो, मग ही कार तर चक्क डोक्यावरुन गेली, मग विचार करा की या महिलेसोबत काय घडू शकते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 15 डिसेंबर : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. लहान मुलांचे, प्राण्यांचे, गमतीचे आणि काही थरारक व्हिडिओज असतात. त्यांना युझर्सची पसंती मिळते. काही व्हिडिओज तर इतके हादरवणारे असतात, की पाहताना अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक महिला पाणी पीत असताना मागून येणारी गाडी तिच्या डोक्यावरून जाते. तरीही ती महिला तशीच राहते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. धावत्या गाडीचा नुसता धक्का लागला तरी एखाद्याचा जीव जाऊ शकतो. वेगात असलेली गाडी थोडी जास्त जवळून गेली तरी आपल्याला भीती वाटते. असं असताना एखादी वेगातली गाडी डोक्यावरून गेली तर तिथे असलेल्या व्यक्तीचं काय होईल? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतलं दृष्य जीव मुठीत धरून पाहायला लागेल असं आहे. हे ही पाहा : रस्त्यावर स्केटिंग करत असताना, बाजुच्या कारचा दरवाजा उघडला आणि मग… पाहा Video या व्हिडिओत एक महिला बाटलीतून पाणी पिताना दिसते आहे. त्याच वेळी मागून वेगात एक कार त्या महिलेच्या दिशेनं येताना दिसते. हळूहळू ती कार इतकी जवळ येते व पाहणारे डोळे मिटूनच घेतील; पण प्रत्यक्षात ती कार त्या महिलेच्या डोक्याच्या वरून जाते. हे सगळं होत असताना ती महिला जराही विचलित होत नाही. उलट हे सगळं ती मोबाइलमध्ये रेकॉर्ड करताना दिसत आहे.

    कार जवळ आल्यावर पुढे काय होणार याबाबत अनेकांना अंदाज येईल; मात्र अपेक्षेनुसार ती महिला कारच्या अपघातात न सापडता, चक्क जिवंत राहते. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला 27 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 12 हजार जणांनी व्हिडिओ लाइक केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी हा स्टंट असल्याचं म्हटलंय, तर काहींनी हे व्हिडिओ एडिट करून तयार केल्याचं म्हटलंय. हा व्हिडिओ पाहून तो प्रोफेशनल्सकडून शूट केल्याचं लगेच लक्षात येतं. खऱ्या आयुष्यात असे प्रसंग शूट करण्यासाठी तितक्याच कौशल्यांची आवश्यकता आहे. व्यवस्थित काळजी घेतल्याशिवाय, ते शूट करता येऊ शकत नाहीत. लान्स नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होतात. पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारेही काही व्हिडिओ असतात. त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे; मात्र हा व्हिडिओ खरा आहे, की एडिटिंग करून तयार केला आहे, याबाबत युझर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात