वॉशिंग्टन, 4 सप्टेंबर : अमेरिकेतील (America) अनेक भागात पावसामुळे ( Heavy Rain) मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले आहेत. तर काहीच्या गाड्या बुडाल्या आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (VideoViral) होत आहे. या व्हिडीओमध्ये घराच्या बेसमेंटमध्ये पुराचं पाणी शिरलं असून यामुळे कुटुंबीय अडकल्याचं दिसत आहे. ही घटना न्यूजर्सीची असल्याचं समोर आलं आहे. जेनिकाने सांगितलं की, त्याच्या मुलासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. पहिल्यांदा पावसाचं पाणी घरात आलं, त्यानंतर घराचं दार कोसळलं आणि पाण्याचा वेग वाढला. यामध्ये घरातील वस्तू वाहताना दिसत आहे. सुदैवाने यात त्याच्या मुलाचा जीव वाचला आहे. तो शिड्यांवरुन वरच्या मजल्यावर गेला होता. त्याला जरा तरी उशीर झाला असता तर त्याच्या जीवावर बेतलं असतं. पाण्याचा वेग इतका जास्त होता की, वाहून गेला असता.
हे ही वाचा- खतरनाक! उंच कड्यावरून झेपावत हवेत साधला डाव; कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजणं यामागे क्लायमेट चेंजचं कारण सांगत आहेत. यानंतर तातडीने या कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आलं. इतकं पाणी भरल्यानंतर घराच्या खिडक्या तोडून त्यांना मदत मागावी लागली.