जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याच्या तोंडावरुन नेली गाडी, हे दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात

रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याच्या तोंडावरुन नेली गाडी, हे दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात

व्हारयल व्हिडीओ

व्हारयल व्हिडीओ

कारचालकाला खाली कुत्रा आहे हे माहिती असून देखील त्याने धक्कादायक प्रकार केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    पिंपरी चिंचवड, 20 जुलै : माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहण्याची हिंमत कदाचित तुम्ही करु शकणार नाही. हे दृश्य तुम्हाला विचलीत करु शकतात, कारण यामध्ये एका अज्ञात कार चालकाने एका मुक्याप्राण्यावरुन आपली गाडी नेली ज्यामुळे त्या प्राण्याचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर गाढ झोपलेला कुत्रा बघितल्या नंतरही एक कार चालक त्याच्या तोंडावरु गाडी घालून त्याला चिरडून पुढे जातांना दिसतो आहे. ही घटना खूपच संतापजनक आहे. नागरिकांनी या घटनेबद्दल रोष व्यक्त केला आहे. शिवाय संबधित चालकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केल्याची मागणी लोकांनी केलेली. लाल रंगाची गाडी या कुत्र्यावरुन जाताना दिसत आहे. कुत्र्याला रस्त्याच्या कडेला झोपलेलं पाहून देखील त्याच्या तोंडावरुन आधी पुढचं चाक चालकानं नेलं, त्यानंतर मग मागचं चाक देखील त्याने कुत्र्याच्या तोंडावरुन नेलं. त्याला माहिती असून देखील त्याने असं केल्यामुळे लोकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

    जाहिरात

    मात्र मागील सात दिवसांपासून संबधित चालक सापडत नसल्याने स्थानिक नागरिक असलेले प्रज्वल दुबे यांनी कार चालकबाबत माहिती देणाऱ्यास 5000 हजार देण्याची घोषणा केलीय. भटक्या कुत्र्याशी आपलं काही नातं नाहीय मात्र जो कार चालक बेदरकारपणे कुत्रे चिरडू शकतो तो पुढे माणसानाही चिरेडल आणि म्हणून आपण तो कर चालक शोधून त्याच्या विरुद्ध कारवाईची मागणी करत असल्याचं दुबे म्हणाले. तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत शहरातील भटक्या श्वानांच्या सुरक्षेते बाबत उपाय योजना कराव्या अशी देखिल मागणी दुबे यांनी केलीय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात