Home /News /viral /

अंधश्रद्धेचा कळस; चक्क जीभ कापून केली देवीला अर्पण, मंदिरातच तरुणीसोबत घडलं विपरीत

अंधश्रद्धेचा कळस; चक्क जीभ कापून केली देवीला अर्पण, मंदिरातच तरुणीसोबत घडलं विपरीत

आपल्या देशात अंधश्रद्धेचं प्रमाण आजच्या काळातही खूप आहे. कित्येक वेळा कोणा मांत्रिकाच्या सांगण्यावरून, तर बऱ्याचदा स्वतःच नवस बोलून अनेक जण या अंधश्रद्धेतून अघोरी (Bizarre Incident) प्रकार करत असतात.

    मुंबई, 25 जून-  आपल्या देशात अंधश्रद्धेचं प्रमाण आजच्या काळातही खूप आहे. कित्येक वेळा कोणा मांत्रिकाच्या सांगण्यावरून, तर बऱ्याचदा स्वतःच नवस बोलून अनेक जण या अंधश्रद्धेतून अघोरी (Bizarre Incident) प्रकार करत असतात. मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातल्या एका तरुणीने चक्क आपली जीभ कापून देवीला अर्पण (Woman offered her tongue to goddess) केली. धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी रक्तस्रावामुळे मंदिराच्या आवारातच बेशुद्ध पडली; मात्र कोणीही तिला मदत करण्यासाठी पुढे नाही आलं. श्रद्धा म्हणून केला अघोरी प्रकार मध्य प्रदेशातल्या बडागांव (Madhya Pradesh Bizarre incident) येथे राहणारी ही तरुणी देवीची भक्त होती. देवीमातेला प्रसन्न करण्यासाठी म्हणून तिने आपली जीभ कापून (Woman cut her tongue in temple) ती मंदिराच्या खिडकीतून मातेच्या चरणापाशी फेकली. गुरुवारी (23 जून) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर ही तरुणी तिथेच बेशुद्ध पडली. गावचे सरपंच सोनेलाल कोल यांनी याबाबत माहिती दिली. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वडील घरी नसताना गेली मंदिरात या तरुणीच्या घरातल्या कोणालाही याबाबत माहिती नव्हती. वडील घरी नसताना स्वतःच मंदिरात जाऊन तिने हा प्रताप (Tongue offered to Goddess) केला. तरुणीची ओळख पटल्यानंतर तिच्या वडिलांना फोन करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपण कामासाठी बाहेर गेलो असल्याचं सांगितलं. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी मंदिराकडे धाव घेतली. त्या ठिकाणी ही तरुणी बेशुद्ध पडली होती. (हे वाचा:प्रसूतीनंतर वजन कमी करणं पडलं महागात; थेट जावं लागलं ‘आयसीयू’मध्ये ) मंदिरात पूजा सुरूच राहिली हा सगळा प्रकार घडल्यानंतरही मंदिरातल्या भाविकांनी तरुणीला मदत केली नाही. शेवटी एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांसोबत मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात नेण्याची गरज होती; मात्र जेव्हा डॉक्टरांनी तरुणीला तिथून हलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मंदिरातल्या भक्तांनी त्यांना अडवलं. जोपर्यंत या तरुणीची जीभ परत येत नाही, तोपर्यंत मंदिरात पूजा सुरूच राहील, असं त्यांचं म्हणणं होतं. अखेर पोलीस आणि तरुणीच्या नातेवाईकांच्या मदतीने या तरुणीला तिथून रुग्णालयात नेण्यात आलं.रुग्णालयात या तरुणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
    First published:

    Tags: Madhya pradesh, Viral news

    पुढील बातम्या