जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video: सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी काहीही; धावत्या मालगाडीच्या छतावर तरुणांचं जीवघेणं कृत्य

Video: सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी काहीही; धावत्या मालगाडीच्या छतावर तरुणांचं जीवघेणं कृत्य

धावत्या मालगाडीच्या छतावर स्टंट

धावत्या मालगाडीच्या छतावर स्टंट

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण चालत्या मालगाडीच्या छतावर उभे राहिल्याचं पाहायला मिळतं. ते मालगाडीवर शर्ट काढून स्टंटबाजी करताना दिसत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 जून : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा तर ते आपल्या जीवाचीही पर्वा न करता व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी जीवघेणे स्टंट करताना दिसतात आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात.. स्टंटबाजीचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये अशा लोकांवर कारवाईही झाली आहे. असं असलं तरी लोक यातून धडा घेत नाहीत आणि अनेकदा असे स्टंट व्हिडिओ व्हायरल होतात. Viral Video: तरुणीनं सिंहाला स्पर्श करताच सिंहिणीची सटकली; मग जे केलं ते पाहून थरकापच उडेल वेगवेगळ्या पद्धतीने बाइक चालवून खतरनाक स्टंट केल्याचे व्हिडिओ तुम्ही खूप पाहिले असतील. मात्र, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही घाबरून जाल. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण धावत्या मालगाडीच्या छतावर उभे राहून स्टंट करत असल्याचं पाहायला मिळतं.

जाहिरात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ग्रेटर नोएडाचा असल्याचं समोर येत आहे. ज्यामध्ये दोन तरुण चालत्या मालगाडीवर फिल्मी स्टाईलमध्ये स्टंट करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण चालत्या मालगाडीच्या छतावर उभे राहिल्याचं पाहायला मिळतं. ते मालगाडीवर शर्ट काढून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण मालगाडीच्या छतावर तिथे उभे आहेत, जिथे दोन डबे जोडले जातात. दोघांनीही त्यांचे दोन्ही पाय चालत्या मालगाडीच्या वेगवेगळ्या डब्यांवर ठेवले आहेत. मालगाडी कालव्यावरून जात असताना हा व्हिडिओ बनवला गेला आहे. हा स्टंट अतिशय जीवघेणा आणि घातक आहे. ट्रेनच्या वरती हाय टेंशन वायर आहे, ज्याला स्पर्श झाल्याने आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र असं असतानाही हे दोघं ट्रेनच्या छतावर उभे राहून रील्स बनवत आपले मसल्स दाखवत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात