जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बॅचलर्सना दिलेलं घर जेव्हा घर मालकानं पाहिलं... समोर जे दिसलं ते पाहून धक्काच बसला

बॅचलर्सना दिलेलं घर जेव्हा घर मालकानं पाहिलं... समोर जे दिसलं ते पाहून धक्काच बसला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका घरमालकाने बॅचलर्सला घर दिलं होतं, पण या बॅचलर्सनी घर सोडलं तेव्हा मात्र या घराची अशी अवस्था करुन ठेवली की, त्याला धक्काच बसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : बॅचलर्सना भाड्याने घर घ्यायचं असेल, तर त्याहून कठीण काम दुसरं नाही. कारण बहुतांश घरमालक हे फॅमेलीला घर देणं पसंत करतात, त्यामुळे बॅचलर्सना घर मिळणं अवघड होऊन बसतं आणि जर घर मिळालंच तर मात्र तारेवरची कसरत होते. कारण ते असंख्य असे नियम लावतात, जे बऱ्याचदा मान्य करणं देखील कठीण होऊन बसतं. पण बॅचलर्सला घर ने देण्यामागे अनेक कारणं देखील आहेत. त्यांपैकी एक हल्लीच समोर आलं आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं आहे, ज्याबद्दल Reddit वर माहिती मिळाली. ज्यामध्ये सांगितलं गेलं की, एका घरमालकाने बॅचलर्सला घर दिलं होतं, पण या बॅचलर्सनी घर सोडलं तेव्हा मात्र या घराची अशी अवस्था करुन ठेवली की, त्याला धक्काच बसला. याघराचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. तुमच्या फ्रीजमधूनही आवाज येतो, मग ही धोक्याची घंटा? या बॅचलर्सने घराच्या रिकामी कोपऱ्यात असंख्य अशा रिकाम्या बिअरच्या बाटल्या सोडल्या होत्या, शिवाय घरी इतका कचरा केला होता की खूपच घाण वास येत होता. स्लॅब आणि तुटलेल्या कपाटांभोवती पडलेल्या कचऱ्याने स्वयंपाकघर अस्वच्छ दिसत होतं. फ्लॅटमध्ये एवढा कचरा पाहून असे वाटले की तो बराच काळ साफ केला गेला नाही.

News18

हे फोटो शेअर करत त्याला कॅपशन दिलं गेलं होतं की, “हे कारण आहे की ज्यामुळे ओनर बॅचलर्सना भाड्याने घर देत नाही. एका “मल्टी नॅशनल कंपनी” मध्ये काम करणाऱ्या एका सुशिक्षित अविवाहित पुरुषाने बंगळुरूमध्ये हे कृत्य केलं आहे. हे ऐकून तर अनेकांना आणखी जास्त धक्का बसला.

News18लोकमत
News18लोकमत

बंगळुरूतील या घरमालकाने Reddit वर खुलासा केला होता की, त्याने एका मोठ्या MNC साठी काम करणाऱ्या एका सुशिक्षित बॅचलरला त्याचा 2 BHK फ्लॅट भाड्याने दिला होता. 3-4 महिन्यांचे भाडे भरल्यानंतर, भाडेकरू अचानक गायब झाला आणि नंतर फोन करून कळवले की त्याला फ्लॅट रिकामा करायचा आहे आणि सुरक्षा ठेव परत हवी आहे.

News18

हे सगळं ऐकल्यावर जेव्हा घरमालक खोलीवर पोहोचला तेव्हा त्याने जे घरी पाहिलं, ते पाहून त्याला धक्का बसला, ज्यानंतर त्याने हे सगळं सोशल मीडियावर शेअर करण्याचं ठरवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात