मुंबई १५ नोव्हेंबर : सोशल मीडियावर नेहमीच अशी प्रकरणं समोर आली आहेत. जी ऐकताना आपल्याला आश्चर्यचकीत करतात. आपल्याला हेल्थ रिलेटेट काहीही समस्या आल्या की आपण डॉक्टरांकडे जातो आणि ते सांगतील तसं उपचार देखील करतो. अनेकदा डॉक्टर मोठ्यातल्या मोठ्या आजारांमधून देखील एखाद्या व्यक्तीला ठणठणीत बरे करतात. पण असे काही डॉक्टर आहेत, जे हे सगळं मातीमोल ठरवतात. सध्या अमेरिकेतून एक असंच प्रकरण समोर आलं आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्काच बसेल. एका नर्सने रुग्णाला न विचारता त्याचा पाय कापल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे नर्सनेही याबाबत रुग्णाच्या कुटुंबीयांना देखील काहीही माहिती दिली नाही. अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाला. हे ही वाचा : Video : सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार… पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण हे प्रकरण नक्की काय? हे प्रकरण अमेरिकेतील एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राउन असे या नर्सचे नाव असून ही नर्स स्प्रिंग व्हॅली हेल्थ अँड रिहॅब सेंटरमध्ये काम करत होती. त्याच वेळी, अशा काही रुग्णांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जे अत्यंत गंभीर आजारी होते आणि त्यांच्यावर तात्काळ उपचारी गरज होती. पण या नर्सने भलताच कारभार केला. तिने कोणालाही न विचारता या रुग्णाचा थेट पाय कापला. याबद्दल जेव्हा नर्सला विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, हा रुग्ण मरणार होता, तसेच त्याचा मृत्यू झाल्यानंतर मी त्याचा पाय काढला. कारण तो मला एका रिसर्च सेंटरमध्ये ठेवायचा होता. कहानीमध्ये ट्वीस्ट या कहानीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा असे आढळून आले की नर्सने कोणाचीही परवानगी न घेता किंवा डॉक्टरांकडून कोणतेही आदेश नसताना त्याचा पाय कापला होता. यानर्सने तिच्यासोबतच्या कर्मचार्यांना सांगितलं की तिला तिच्या टॅक्सीडर्मीच्या दुकानात पाय जपून ठेवायचा आहे आणि प्रदर्शित करायचा आहे. परंतू टॅक्सीडर्मीच्या दुकानात प्राण्यांच्या शरीराशी निगडीत वस्तू ठेवल्या जातात. त्यामुळे तिच्या बोलण्यात तफावत जाणवली आणि ती फसली.
तसेच या रुग्णाचा पोस्टमार्टम रिपोर्ट्स देखील काढला. तेव्हा हे समोर आले की या रुग्णाचा पाय त्याच्या मृत्यू पूर्वी काढला होता. त्यानुळे नर्सचा गुन्हा सर्वांसमोर आला आणि तिला अटक करण्यात आली. सध्या नर्सने आपला गुन्हा कबूल केला आहे. नर्सला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार असून तिला शिक्षा देखील होऊ शकते. पण या नर्सने नक्की असं का केलं किंवा या मागचा तिचा खरा हेतू कोणता होता? हे काही तिने सांगितलेल नाहीय.