जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हॅलोवीनचा प्रॅंक समजून मुलीच्या ओरडण्याकडे आईचं दुर्लक्ष; खरी गोष्ट लक्षात येताच बसला धक्का

हॅलोवीनचा प्रॅंक समजून मुलीच्या ओरडण्याकडे आईचं दुर्लक्ष; खरी गोष्ट लक्षात येताच बसला धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अनेकदा जल्लोषात सण, सोहळा साजरा करताना अनपेक्षित घटना घडतात. अशीच एक विचित्र घटना हॅलोवीनच्या दिवशी इंग्लंडमध्ये घडली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 6 नोव्हेंबर : पाश्चात्य देशांमध्ये 31 ऑक्टोबरला हॅलोवीन डे साजरा झाला. हॅलोवीनचं पाश्चात्य देशांमध्ये विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं, की या दिवशी मृत व्यक्तींचे आत्मे अर्थात पूर्वज त्यांच्या घरी येतात. या दिवशी मुलं-मोठी माणसं भीतिदायक वेश परिधान करतात. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, असं तिकडे मानलं जातं. या दिवशी कुणी झोम्बी, चेटकीण, भूत असे विविध वेश परिधान करतात. इंग्लंडमध्ये या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. आपली मुलगी हॅलोवीनमधला प्रँक म्हणून किंचाळत असेल असं वाटल्याने आईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं; मात्र प्रत्यक्षात धक्कादायक प्रकार घडलेला होता. अनेकदा जल्लोषात सण, सोहळा साजरा करताना अनपेक्षित घटना घडतात. अशीच एक विचित्र घटना हॅलोवीनच्या दिवशी इंग्लंडमध्ये घडली. एक महिला कामासाठी बाहेर गेली होती. परंतु, घरी परत आल्यावर तिची मुलगी आरडाओरडा करून तिला हाका मारत होती. आईला वाटलं, की हॅलोवीनचा प्रॅंक म्हणून आपल्याला घाबरवण्यासाठी मुलगी ओरडतेय; पण शंका आल्याने ती मुलीपाशी गेली. तिने मुलीचा चेहरा पाहिला आणि पाहताच क्षणी आईला चांगलाच धक्का बसला. आपल्या मुलीच्या ओठाला खरीखुरी जखम झालीय, असं तिला दिसलं. तिच्या ओठातून रक्त येत होतं. हे ही वाचा : Fact About Tip : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली? डेली स्टार रिपोर्टच्या वृत्तानुसार, इंग्लंडमध्ये एसेक्स भागात ही घटना घडली. ट्रेसी प्लेडेल असं पीडित मुलीच्या आईचं नाव आहे. तिने सांगितलं, की सोमवारी 31 ऑक्टोबरला तिची 14 वर्षांची मुलगी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत हॅलोविनसाठी गेली होती. ती चर्च व्ह्यू भागात त्यांच्यासोबत गेली होती. घरी परत आल्यावर आपली मुलगी तिला मिळालेली गिफ्ट्स, चॉकलेट्स घेऊन आपल्या खोलीत गेली. काही वेळाने तिच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज यायला लागला. ट्रेसी म्हणाली, की ‘तिला असह्य वेदना होत होत्या आणि ती तशाच अवस्थेत मला हाका मारत होती. सुरुवातीला मला असं वाटलं, की ती प्रॅंक करतेय; पण मी जेव्हा तिच्यापाशी गेले तेव्हा मी हादरलेच. तिचे ओठ फाटले होते. तिला नीट बोलताही येत नव्हतं.’ Watch Video : मोबाईल चोरून पळाला चोर, पण दुसऱ्याच क्षणी घडलं असं काही की मिळालं ‘कर्माचं फळ’ नक्की काय घडलं? ट्रेसीने घडल्या प्रकाराबद्दल सांगितलं, की ‘माझ्या मुलीला कुणीतरी चॉकलेटमध्ये लपवून धारदार ब्लेड दिलं. खरं तर चॉकलेटचा रॅपर थोडा निघाला होता; पण तो कुणी तरी पूर्ववत केला होता. मुलीने आनंदाच्या भरात चॉकलेट खाल्लं आणि तिची अवस्था भयानक झाली. त्यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. कुणी असं काही करेल, असा मी विचारही करू शकत नाही. अशाप्रकारे कुणाची थट्टा करणं चुकीचं आहे. त्याहीपेक्षा एखाद्या लहान मुलासोबत असं करणं हे अयोग्य आहे. आता स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून तपास सुरू आहे.’ युरोपीयन देशात हा सण साजरा केला जातो. त्यात लहान मुलं एकमेकांना शुभेच्छा आणि गिफ्ट्स देतात. त्यांनी चित्रविचित्र कपडे परिधान केलेल असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात