मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्वतःच्या घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोकला तब्बल 27 हजारांचा दंड, पण कारण काय?

स्वतःच्या घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोकला तब्बल 27 हजारांचा दंड, पण कारण काय?

आता तुमची Google Search History पासवर्डने सुरक्षित होईल.

आता तुमची Google Search History पासवर्डने सुरक्षित होईल.

एक महिला स्वतःच्या घरात फोनवरती जोरजोरात बोलत होती. याचा शेजार्‍यांना त्रास होत असल्यामुळं त्यांनी तिला हळू आवाजात बोलण्यास सांगितलं. मात्र, तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर ती ऐकत नाही, असं पाहून शेजार्‍यांनी पोलिसांना फोन लावला.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 14 जुलै : स्वतःच्या घरात स्वतःच्या फोनवर बोलणं हा कधी गुन्हा ठरू शकतो का? यासाठी पोलीस कधी दंड लावू शकतात का? भारतात तरी अशा घटना फारशा ऐकण्यात नाहीत. मात्र, अमेरिकेत विचित्र प्रकारचे गुन्हे आणि त्यावर दंड ठोकला जाणे ही बाब सामान्य आहे. इथं स्वतःच्या घरातही ठराविक आवाजाच्या मर्यादेपेक्षा मोठ्यानं बोलणं हा गुन्हा ठरतो. तसंच यासाठी दंडही आकारला जातो.

अमेरिकेतील ईस्ट पॉईंट येथे राहणारी एक महिला स्वतःच्या घरात फोनवरती जोरजोरात बोलत होती. याचा शेजार्‍यांना त्रास होत असल्यामुळं त्यांनी तिला हळू आवाजात बोलण्यास सांगितलं. मात्र, तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर ती ऐकत नाही, असं पाहून शेजार्‍यांनी पोलिसांना फोन लावला. पोलीसही अगदी तत्परतेने हजर झाले आणि त्यांनी फोनवर मोठ्या आवाजात बोलणार्‍या महिलेला 385 $ अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोकला. याचं मूल्य भारतीय रुपयात तब्बल 27 हजार इतकं होतं.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, डायमंड रॉबिन्सन (Diamond Robinson) असं फोनवर मोठ्यानं बोलणाऱ्या महिलेचं नाव आहे. ही महिला Cushing Street, Eastpointe इथं राहते. तिनं स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली आहे. आपण कृष्णवर्णीय असल्यानं आपल्यासोबत हा प्रकार घडला. अशा प्रकारे दंड लावण्यात आल्यानं आपल्यावर अन्याय झाल्याचं तिचं म्हणणं आहे.

सार्वजनिक शांतता भंग केला म्हणून लावला दंड

डायमंड रॉबिन्सन स्वतःच्या घरात फोनवर बोलता-बोलता जिन्यावरून खाली-वर ये-जा करत होती. शेजारच्या महिलेनं तिला ती मोठ्या आवाजात बोलत असल्याची जाणीव करून देत हळू आवाजात बोलावं किंवा फोन ठेवावा असं सांगितलं. यावर आपण आपल्या घरात आहोत आणि तिथे असताना काय करायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, असं रॉबिन्सनचं म्हणणं होतं. तिनं शेजारी महिलेला तिथून निघून जाण्यास सांगितलं. शेजारच्या महिलेच्या सांगण्यानंतरही ती फोनवर मोठ्यानं बोलत राहिल्यानं तिची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. यानंतर केवळ तीन मिनिटांत पोलीस तिथं हजर झाले आणि त्यांनी रॉबिन्सनला 385 $ अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला.

कृष्णवर्णीय असल्यानं आपल्यावर अन्याय झाला

पोलिसांनी रॉबिन्सनच्या घरी येऊन तिच्यावर कारवाई केल्यानंतर तिनं या घटनेचं फेसबुक लाईव्ह केलं. तसंच आपल्याला लावण्यात आलेला दंड चुकीचा असून आपण त्या विरोधात आवाज उठवू, असं तिने म्हटलं आहे. यासाठी ती स्वतःच्या घरातला सीसीटीव्ही फुटेजही शेअर करणार आहे. आपण कृष्णवर्णीय असल्यामुळंच आपल्यावरती अशा प्रकारचा अन्याय झाला, असं रॉबिन्सननं म्हटलं आहे. आपल्या शेजारी राहणारी महिला काही दिवसांपूर्वीच तिथे राहायला आल्याचंही तिनं सांगितलं.

हे वाचा - YouTube VIDEO पाहून घरात छापत होते नकली नोटा, नागपूरच्या 2 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद

मला का लक्ष्य करण्यात येत आहे? मी शेजारच्या महिलेचं काय बिघडवलं आहे? ती माझ्यावर का नाराज आहे? हे सर्व काय चाललं आहे? असे प्रश्न रॉबिन्सन उपस्थित केले आहेत. मात्र, तिची पोलिसात तक्रार करणाऱ्या महिलेने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published:

Tags: Mobile Phone, Police action