Home /News /viral /

स्केटिंग करताना घडली भयंकर दुर्घटना; तरुणाची अवस्था पाहून उडेल थरकाप, VIDEO

स्केटिंग करताना घडली भयंकर दुर्घटना; तरुणाची अवस्था पाहून उडेल थरकाप, VIDEO

रस्त्यावर स्केटिंग करणाऱ्या लोकांनाही विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण यातही दुर्घटनेची शक्यता असतेच. सोशल मीडियावर सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे (Shocking Video Viral).

    नवी दिल्ली 06 मार्च : दुर्घटना कधीही सांगून होत नाहीत, हे तुम्हालाही चांगलंच माहिती असेल. त्यामुळे रस्त्यावर चालताना अतिशय सावध राहाणं आवश्यक आहे. तुम्ही पाहिलं असेल की भरधाव वेगातील गाड्यांचेच अनेकदा अपघात होतात. याच कारणामुळे लोकांना नेहमी गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला दिला जातो. कारण याच फक्त गाडी चालवणाऱ्याचंच नाही तर अपघात झाल्यास दुसऱ्याचंही नुकसान होतं. रस्त्यावर स्केटिंग करणाऱ्या लोकांनाही विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण यातही दुर्घटनेची शक्यता असतेच. सोशल मीडियावर सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे (Shocking Video Viral). बससमोर स्टंट करणं पडलं महागात; रस्त्यावरच पलटी झाली कार, अपघाताचा LIVE VIDEO यात एका व्यक्तीसोबत रस्त्यावर स्केटिंग करताना गंभीर दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतं (Serious Accident While Skating). व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रिकाम्या रस्त्यावर अगदी वेगात स्केटिंग करत असतो. याचदरम्यान त्याचा बॅलन्स बिघडतो आणि अगदी जोरात तो स्केटबोर्डवरुन खाली कोसळतो. अगदी वेगात स्केटिंग करत असल्यामुळे तो दूर जाऊन पडतो. सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेलं असल्यानं डोक्याला मार लागत नाही. ज्या पद्धतीने हा व्यक्ती पडतो, ते पाहून अंदाज येतो की त्याला भरपूर मार लागला असेल. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा हैराण करणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कॅप्शनमधून त्यांनी लोकांना मोठी शिकवण दिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, दुर्घटना कधीच सांगून होत नाहीत. त्यामुळे वाहन चालवताना, खेळताना तसंच काम करताना आपल्याला सुचवण्यात आलेली सुरक्षा उपकरणे नेहमी नियमांसह वापरा. VIDEO: दे धक्का! शेकडो प्रवाशांनी खाली उतरून दिला ट्रेनला धक्का; का आली अशी वेळ? अवघ्या 5 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारहून अधिकांनी पाहिला आहे, तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, तुम्ही चूक केली नाही, तरी समोरचा चूक करू शकतो. त्याचीही काळजी घ्यावी लागते. सगळ्यांना विनंती करतो, रस्त्यावर सांभाळून चालत जा. दुर्घटनेपासून वाचा.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Road accident, Shocking video viral

    पुढील बातम्या