जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : साडी सेल पाहून महिलांची गर्दी, पुढच्याच क्षणी दोघींमध्ये तुफान हाणामारी

Viral Video : साडी सेल पाहून महिलांची गर्दी, पुढच्याच क्षणी दोघींमध्ये तुफान हाणामारी

महिलांचा भांडणाचा व्हिडीओ

महिलांचा भांडणाचा व्हिडीओ

महिला खरेदीला गेल्यावर विक्रेत्याशी वाद घालताना तुम्ही पाहिलं असेल मात्र कधी महिलेला दुसऱ्या ग्राहक महिलेसोबत जोरदार हाणामारी करताना पाहिलं का? असाच काहीसा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जुलै : तुम्ही कुठेही खरेदीसाठी गेले तरी त्याठिकाणी गर्दी पहायला मिळते. अशा गर्दीच्या ठिकाणी तर तू तू मैं मैं होणं सहाजिकच आहे. मात्र ज्या ठिकाणी महिलांची गर्दी आहे तिथे वाद किंवा भांडण होणार नाही असं होईल का? महिला खरेदीला गेल्यावर विक्रेत्याशी वाद घालताना तुम्ही पाहिलं असेल मात्र कधी महिलेला दुसऱ्या ग्राहक महिलेसोबत जोरदार हाणामारी करताना पाहिलं का? असाच काहीसा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये साडीवरुन महिलांमध्ये भांडण झालं. एका ठिकाणी साडीचा सेल लागला होता. मग काय महिला साडी घेण्यासाठी तुटून पडल्या. त्याठिकाणावर खूप गर्दी झाली. काही महिलांची साडीवरुन फ्री स्टाईस हाणामारीही पहायला मिळाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

@GaggaCute नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साडीचा सेल लागला आहे. महिलांची साडी घेण्यासाठी तुफान गर्दी दिसतेय. तेवढ्यात अचानक साडीवरुन दोन महिला वाद घालू लागतात. हळू हळू हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचतो. दोघीही एकमेकांचे केस ओढत फ्री स्टाईल हाणामारी करत आहेत.

जाहिरात

काही महिला मध्ये पडून दोघींची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सर्व घटना कोणतीपी हळूच कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा 15 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. सोशल मीडियावर महिलांचे मारहाणीचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये सीटवरून महिलांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. असे अनेक ठिकाणचे महिलांचे हाणामारीची प्रकरणे समोर आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात