Home /News /viral /

पोटात जोरजोरात ओरडू लागले कावळे; काही खायला मिळालं नाही म्हणून भुकेल्या नवरीने रस्त्यातच... VIDEO VIRAL

पोटात जोरजोरात ओरडू लागले कावळे; काही खायला मिळालं नाही म्हणून भुकेल्या नवरीने रस्त्यातच... VIDEO VIRAL

नवरीबाईला भूक आवरली नाही आणि मग तिने...

  मुंबई, 09 ऑक्टोबर : बहुतेक लग्नात (Wedding video) नवरा-नवरीला (Bride Groom video) उपाशी ठेवण्याची पद्धत असते. म्हणजे लग्न लागेपर्यंत दोघांनीही काहीच खाऊ दिलं जात नाही किंवा लग्नाच्या तयारीत, गडबडीत त्यांना खायलाच वेळ मिळत नाही आणि मग नंतर भुकेने त्यांची अवस्था अक्षरशः खराब होते. एका भुकेल्या नवरीचा (Hungry bride video) असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक नवरी नटूनथटून तयार होऊन आपल्या लग्नाला निघाली. उत्साहात दिवसभर तिने काहीचं खाल्लं नाही. त्यामुळे तयारी करून जेव्हा ती लग्नासाठी मांडवाकडे निघाली तेव्हा मात्र तिच्या पोटात कावळे ओरडू लागले. तिला इतकी भूक लागली की काय करावं काय नाही ते तिला सूचतचं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरून तिला किती भूक लागली आहे हे स्पष्ट होतं.
  View this post on Instagram

  A post shared by ShaadiSaga.com (@shaadisaga)

  जशी ती बाहेर पडते तशीच ती काही खायला आहे का विचारते. तिचा भाऊ समोर उभा असतो. ज्याच्या हातात कॉफीचा कप असतो. भुकेल्या नवरीबाईला कॉफी पाहून राहवत नाही. ती पळत त्याच्याकडे जाते आणि चल कॉफी तरी दे असं ती सांगते आणि रस्त्यातच कॉफीचा एक सिप मारते. हे वाचा -  VIDEO - मेहुण्यांनी रस्ता अडवून दिला त्रास; वैतागलेला नवरदेव छतावरच चढला आणि... शादी सागा इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या