मुंबई 19 सप्टेंबर : सोशल मीडियावर एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. खरंतर जेव्हा चंद्राचं गाणं आलं तेव्हाच त्याने अनेकांना वेड लावलं, जिथे पाहू तिथे अभिनेत्री अमृता खानविलकरचा डान्स आणि चंद्राच. परंतू या सगळ्याला मागे टाकत एका शाळकरी मुलाच्या चंद्राने लोकांच्या मनावर राज करायला सुरुवात केली आहे. या मुलाच्या गाण्याचं अख्ख्या महाराष्ट्राला असं काही वेड लागलंय की बस्स… अगदी एका रात्रीत या चिमुकल्यानं प्रसिद्धी मिळवली आणि लोकांमध्ये उत्सुक्ता वाढू लागली ती त्याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्याची…. हा मुलगा कोण आहे? त्याला इतकं चांगलं गाणं कसं येतं? वैगरे… वैगरे पाहा व्हिडीओ
शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्खा महाराष्ट्राला लावलंय वेड, पाहा व्हायरल व्हिडीओ#viralvideo #trending #maharastra pic.twitter.com/tT3aKFxOly
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
या मुलाचं नाव आहे जयेश खरे, राहुरी तालुक्यातील वांजुळपोई गावात राहाणार जयेशच्या घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. तो श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडिल ऑर्केस्ट्रामध्ये मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. परिस्थितीमुळे स्वतःला मोठं गायक होता आलं नाही मात्र आपल्या मुलाला मोठा गायक करण्याचं निश्चय त्यावडिलांनी मनाशी नक्की केलाय. ज्यामुळे त्यांनी कसे-बसे पैसे साचवून आपल्या मुलाला गायनाचा क्लास लावला. हल्लीच काही महिन्यांपासून जयेश गाणं शिकायला जात आहे. जयेशच्या आवाजात अशी काही जादू आहे की, त्याने अगदी कोणतंही गाणं गायलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. खरंच जयेशला ही देवानं दिलेली एक देणगी आहे. हे वाचा : ‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल परिस्थीती कशीही असो, पण मनान इच्छा आणि जिद्द असली की सगळं शक्य होतं, हे जयेशने आपल्या आवाजाने दाखवून दिले आहे. फक्त चंद्राच नाही तर जयेश गवळण, पोवाडा सारखी अनेक गाणी गाऊ शकतो. जी खूपच सुंदर आहे.