मराठी बातम्या /बातम्या /Viral /

थेट JCB ला म्हणाला, 'मला पाठ खाजवून दे'; Viral Video पाहून हातच जोडाल

थेट JCB ला म्हणाला, 'मला पाठ खाजवून दे'; Viral Video पाहून हातच जोडाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

सोशल मीडिया (Social Media) वर जेसीबीचा (JCB) एक व्हिडीओ जलद गतीने व्हायरल (Viral Video) होत आहे. जो पाहून तुम्ही हसू रोखू शकणार नाही. या दबंग व्यक्तीने पाठ खाजवण्याचं काम जेसीबीला (Man Uses JCB Excavator To Scratch) सांगितलं. त्याने जेसीबीच्या एक्सवेटरने आपली पाठ खाजवून घेतली. सोशल मीडियावर लोक अनेक प्रकारे यावर टिप्पणी करीत आहेत. काहींनी हा प्रकार मजेशीर असल्याचे सांगितले तर अनेकांनी हा प्रकार धोकादायक असल्याचे सांगितले.

हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती जेसीबीजवळ उभा आहे. आणि कपड्याने पीठ खाजवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्याची खाज जात नाही तेव्हा तो जेसीबीसमोर उभा राहतो आणि पाठ खाजवून द्यायला सांगतो. तो कमरेतून खाली वाकताच जेसीबी एक्सवेटर त्याच्या पाठीजवळ येतो आणि खाजवायला लागतो. क्रेन ऑपरेटर जेसीबीच्या साहाय्याने त्या व्यक्तीची पाठ खाजवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हे ही वाचा-अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

फेसबुकवर हा व्हिडीओ 3 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत 2 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच लाइक्स, कमेंट्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हा व्हिडीओ दक्षिणेकडील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेसीबीने कोण पाठ खाजवतं? असं विचारत लोक पोट धरून हसत आहेत. हा व्हिडीओ शूट झाला तेथील उपस्थित लोकही हे पाहताना हसत आहेत.

First published:

Tags: Viral video.