मुंबई, 4 नोव्हेंबर: क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरनं आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर केवळ देशातीलच नाही, तर जगातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर राज्य केलं. अखंड मेहनतीच्या जोरावर त्यानं अनेक विक्रमांवर आपलं नाव कोरलं आणि क्रिकेटविश्वात दबदबा निर्माण केला. आपल्या कारकिर्दीदरम्यान त्यानं नेहमीच साधेपणा जपला. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातही सचिनचा हा स्वभाव अजिबात बदलला नाही. याचा प्रत्यय अनेक घटनांमधून दिसून येतो. सचिन सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो आणि त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर वरचेवर व्हिडीओ शेअर करत असतो. अलीकडेच एका साध्या चहाच्या टपरीवर जाऊन चहा पितानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता गोव्यामधील त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका छोट्या लोकल रेस्टॉरंटमध्ये जाऊन चक्क चवळी आणि बटाट्याची भाजी खाताना दिसत आहेहे ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल. पण स्वत: सचिननं स्वतः हा व्हिडीओ शेअर केला आहे.
फिश लव्हर सचिन खातोय चवळी अन् बटाट्याची भाजी-
सामान्यपणे लोक गोव्याला जाऊन सीफूड खातात. लोक सीफूड खात असतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. अनेक लोकांना माहिती नाही, परंतु सचिन तेंडुलकरही फिश लव्हर आहे. त्याला मासे खायला खूप आवडतं. परंतु यावेळी जेव्हा तो गोव्याला गेला तेव्हा त्यानं मासे खातानाचा नाही तर ब्रेकफास्ट करतानाचा व्हिडीओ शेअर केला. एका साध्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यानं ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करताना त्याना हा व्हिडीओ शूट केलाय. या व्हिडीओमध्ये सचिन म्हणतो की, “मी आता गोव्यात आहे. येथे मी कॅफे टॅटो नावाच्या एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आलोय. गोव्यात आल्यावर शक्यतो लोक मासे किंवा इतर सीफूड खातात. परंतु मी मात्र या लोकल रेस्टॉरंटमध्ये आलोय.”
एवढंच नाही तर पुढे सचिननं तो काय खात आहे हेही सांगितलं आहे. सचिन म्हणाला की, “मी चवळी, बटाट्याची भाजी, पुरी, पाव खातोय. हे सर्वकाही मस्त आहे. मी माझा ब्रेकफास्ट या लोकल रेस्टॉरंटमध्ये एन्जॉय करतोय."
हेही वाचा: ...अन् सचिनने चाखली महाराष्ट्राची नंबर 1 मिसळ, VIDEO व्हायरल
व्हिडीओ होतोय व्हायरल-
दरम्यान सचिन तेंडुलकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला आहे. सचिनच्या साधेपणाचं नेटकऱ्यांकडून कौतूक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulakar