मुंबई, 12 डिसेंबर: द मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणार सचिन तेंडुलकर (sachin tendulkar )नेहमी कोणत्या ना कोणत्यातरी कारणाने चर्चेत असतो. आताही तो एका खास पदार्थामुळे चर्चेत आला आहे. सचिनने संडे स्पेशल डे बनवत आपल्या चाहत्यांच्या तोंडाला पाणी सोडले आहे. सचिनने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो मिसळ पाववर ताव मारताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर त्याने मिसळबद्दली भावना कॅप्शन आणि शब्दातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रविवार असो किंवा सोमवार, मी कोणत्याही दिवशी मिसळ पाव घ्यायला तयार आहे, असे सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. तसेच, सचिन तेंडुलकरने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मिसळ पावची बातच वेगळी आहे. महाराष्ट्राची मिसळ पाव एक नंबर आहे. असे म्हटले आहे.
सचिन हा एक अस्सल खवय्या आहे, ज्याला चांगले खायला आणि खिलवायलाही आवडते. ”सचिन ना, तो एक नंबरचा खादाड आहे, नुसते बटाटेवडे खात असतो”, असे सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी एकदा म्हटले होते. दरम्यान, सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन अनेक उपक्रमात दिसतो. तो खवय्या असून त्याला विविध पदार्थांची चव चाखायला आवडते. यापूर्वीही सचिन तेंडुलकरने अनेकवेळा स्वयंपाकघरात आपला हात आजमावला होता. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरही शेअर केले होते.