मॉस्को, 31 जानेवारी: सध्या इंटरनेटवर (Internet) डान्स मेरी रानी (Dance Meri Rani) हा डान्स ट्रेंडिंग (Trending) आहे. नूरा फतेहीचा (Noora Fatehi) सिझलिंग परफॉर्मन्स असणारा हा डान्स अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून त्यातील स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसतात. एका रशियन मुलीनंही (Russian Girl) असाच काहीसा प्रयत्न केला असून त्यामुळे या चिमुकलीनं स्वतः नूरा फतेहीचंही लक्ष वेधून घेतलं आहे. इंटरनेटवर वेगवेगळ्या काळात वेगवेगळे डायलॉग आणि गाणी ट्रेंडिंग असतात. सध्या पुष्पा सिनेमातील काही डायलॉग जसे ट्रेंडिंग आहेत, तसाच डान्स मेरी रानी हा डान्सही व्हायरल होऊ लागला आहे.
चिमुकलीचा व्हिडिओ रशियातील सहा वर्षांच्या एका मुलीनं डान्स मेरी रानी या गाण्यावर काही कमाल स्टेप्स सादर केल्या आहेत. एका जिममध्ये उभी राहून ती या गाण्याच्या स्टेप्सवर डान्स करताना दिसते. त्यातील वयाच्या मानाने कठीण वाटाव्यात, अशा काही स्टेप्स ती इतक्या कुशलतेने करते की सर्वांनाच तिचं आश्चर्य वाटतं. हा व्हिडिओ काही काळातच व्हायरल झाला आणि स्वतः नूरा फतेहीपर्यंत पोहोचला. तिनेही हा व्हिडिओ पाहिला आणि तो आपल्याला फारच आवडल्याचं सांगितलं. इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ तिनं शेअर केला असून त्यातील परफॉर्मन्सबद्दल चिमुकल्या मुलीचं कौतुक केलं आहे. विश्वव्यापी संगीत कलेला देशांच्या सीमा नसतात, असं म्हटलं जातं. संगीताच्या बाबतीत तर ही बाब अगदी खरी असल्याचं वारंवार सिद्ध होत असतं. रशियातील या सहा वर्षांच्या मुलीला किंवा तिच्या कुटुंबीयांनाही हिंदी भाषा येत असेल की नाही, हे कुणालाच माहिती नाही. मात्र तरीही बॉलिवूडमधील अनेक हिंदी सिनेमांची गाणी जगभर हिट होत असतात आणि घरोघरी गायली जातात. त्यातील स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो. हे वाचा- ‘काकूबाई’ बनून 28 वर्षाच्या तरुणीने केली बक्कळ कमाई; एका निर्णयाने बदललं आयुष्य व्हिडिओ व्हायरल हा व्हिडिओ काही दिवसांतच जोरदार व्हायरल झाला आहे. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. सर्वजण या मुलीवर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव करत आहेत.