मुंबई, 28 जुलै : आपण श्रीमंत व्हावं किंवा आपल्या श्रीमंत नवरा मिळावा असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होईल. तसेच आपण चांगले कपडे, मेकअप, माहागड्या बॅग आणि गाड्यांमध्ये फिरू असे स्वप्न सगळेच पाहातात. आनंदी आयुष्याचे स्वप्न पहातात. परंतू सर्वांचं स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. पण ज्यांच्याकडे हे सगळं आहे ते खरंच आनंदी आहेत का? एका श्रीमंत नवऱ्याच्या महिलेनं आपली अशीच एक कहाणी सांगितलं आहे. ज्यामध्ये श्रीमंत नवऱ्याची बायको होणं कठीण काम आहे असं ती म्हणाली. करोडपतीशी लग्न करून आपले खूप नुकसान केले आहे असे तिला वाटते. तिने आपली कहाणी सोशल मीडियावर शेअर केली, ज्याबद्दल ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे. या महिलेनं श्रीमंत घरातील महिलांच्या राहणीमानाबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. या महिलेकडे पैशांची कमतरता नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तिचा नवरा ऐशोआराम जीवन जगण्यासाठी पाण्यासारखे लाखो रुपये खर्च करतो. पण या महिलेचं दुखणं काही औरच आहे. ब्रिटिश वंशाच्या सौदी नावाच्या महिलेनं 2020 मध्ये करोडपती जमालशी लग्न केलं. दोघेही दुबईत एका आलिशान राजवाड्यासारख्या घरात राहतात आणि चैनीचे जीवन जगतात. जमाल स्वत: लक्झरी लाइफस्टाइलचा शौकीन आहे, त्याच्या पत्नीनेही असेच जगावे अशी त्याची इच्छा आहे. किती छान आयुष्य असेल असं तुम्हाला जाणवेल. प्रत्येकजण अशा जीवनाची कल्पना करतो. पैशाची चिंता नाही. वाटेल तिथे जा, हवं ते खा, हवं तिथे राहा. मात्र सौदीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सौदीने तिच्या आयुष्यातील असंख्य गुपिते उघड केली आहेत. सांगितले, जेव्हा मी दुबईच्या करोडपती जमालशी लग्न केले तेव्हा काही तडजोड झाल्या होत्या, ज्या सामान्यपणे केल्या जाऊ नयेत. पहिला आणि सर्वात मोठा करार असा होता की मी इतर कोणत्याही माणसाला माझा मित्र बनवू शकत नाही, परंतू जमालसाठी अशी कोणतीही सक्ती नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या कायद्यानुसार त्याला दुसरे लग्न करण्याची परवानगी आहे, त्यासाठी फक्त सौदीची परवानगी घ्यावी लागेल. दुसरी समस्या म्हणजे प्रत्येक वेळी ट्रॅकिंग सौदीने सांगितले की तिच्या फोनमध्ये फोन ट्रॅकर सतत चालू असतो. याचा अर्थ तिचा नवरा ती कुठे आहे हे पाहू शकतो. मात्र, जमालच्या फोनमध्येही असं काहीही नाही, त्यामुळे सौदीला तो कुठे आहे हे कळणार नाही. सौदीच्या म्हणण्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने ते ठीक आहे. दर आठवड्याला लाखो खर्च सौदीने तिच्या खर्चाबाबत खुलासेही केले. तिने सांगितले की जमाल तिच्यावर दर आठवड्याला लाखो रुपये खर्च करतो. सेफोरामध्ये मेकअप आणि स्किन केअरसाठी $3,500, नवीन कारसाठी $1.8 मीलियन डॉलर आणि एका रात्रीच्या बाहेर खाण्यासाठी $1,500 डॉलर खर्च करतो. मला प्रत्येक वेळी मला सुंदर आणि परिपूर्ण दिसले पाहिजे. मला नेहमी खात्री करावी लागते की मी एका विशिष्ट मार्गाने दिसावं आणि विशिष्ट मार्गाने वागावं. कारण आजूबाजूला कोण आहे किंवा कोण तुम्हाला ओळखते हे तुम्हाला कधीच कळत नाही. त्याचा नेहमीच त्रास होतो. तुम्ही स्वतःला अटीं लावून जगू शकत नाही.
सौदीने म्हटले की, करोडपतीची पत्नी असण्याचे इतरही तोटे आहेत. तुम्ही नेहमी तुमच्या पतीभोवती राहू शकत नाही. तो तुम्हाला वेळ देऊ शकत नाही आणि त्याची सवय करून घ्यावी लागेल. तुम्हाला फक्त हे समजले पाहिजे की त्याला तुमच्यासाठी नेहमीच वेळ नसणार. शिवाय परिपूर्ण दिसण्याचा आणि प्रत्येक गोष्टीत नवीनतम आणि श्रेष्ठ बनण्याचा दबाव देखील तुमच्यावर नेहमीच असतो. कारण तुम्ही त्या कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करत असता. ती म्हणाली की मला साधे आणि शांत जीवन आवडते. पण तसं मी जगू शकत नाही. मला माझे जीवन साध्या लोकांसोबत राहू देत नाही. सौदीच्या जीवनशैलीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिलं, ‘‘ते दुःस्वप्न वाटलं असावं’’. दुसरा म्हणाला, ‘‘पैशाने प्रेम किंवा आनंद विकत घेता येत नाही हेच खरं.’’