पाण्यात बुडणाऱ्या 'तरुणी'ला वाचवण्यासाठी धावली रेस्क्यु टीम; पण बाहेर काढल्यानंतर निघाली Sex Doll, PHOTO व्हायरल

जपानमध्ये एक महिला पाण्यात बुडताना दिसली पण त्या रेस्क्यु टीमने महिलेला पाण्यातून वर काढल्यानंतर एक विचित्र गोष्ट सगळ्यांना दिसली.

जपानमध्ये एक महिला पाण्यात बुडताना दिसली पण त्या रेस्क्यु टीमने महिलेला पाण्यातून वर काढल्यानंतर एक विचित्र गोष्ट सगळ्यांना दिसली.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 जून: जगाच्या काना-कोपऱ्यात लक्षावधी घटना घडत असतात. सध्या इंटरनेटमुळे (Internet) त्या लगेचच व्हायरल होतात. कधी आनंददायी असतात कधी विनोदी तर कधी विचित्र. तुम्ही जर कोणत्याही जलाशयाच्या काठावर उभे आहात आणि तुम्हाला पाण्यात कुणीतरी महिला बुडताना दिसली तर तुम्ही काय कराल? पोहता येत असेल तर स्वत: पाण्यात उडी घेऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न कराल, नाहीतर आरडाओरडा करून कुणालातरी बोलवाल जे तिला वाचवू शकतील. अशीच एक घटना जपानमध्ये घडली. पण त्या महिलेला पाण्यातून वर काढल्यानंतर एक विचित्र गोष्ट सगळ्यांना दिसली. तानाका नात्सुकी (Tanaka Natsuki) ही जपानी युट्युबर हाचिनोहे (Hachinohe) इथल्या किनाऱ्यावर फिशिंग व्हिडीओ शूट करत होती. त्यावेळी तिला एक महिला पाण्यात बुडताना दिसली. इतक्यात कुणीतरी रेस्क्यु टीमला (Rescue Team) फोन केल्यामुळे पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पॅरामेडिक्सचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी तातडीने रेस्क्यु ऑपरेशन करून त्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेला पाण्यातून बाहेर काढलं. तेव्हा त्यांना एक अजबच गोष्ट लक्षात आली, की ती महिला नव्हती तर ती रबरी सेक्स डॉल (Rubber Sex Doll) होती. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. रबरी सेक्स डॉलला ‘डच वाईफ’ (Dutch Wife) म्हणतात. काही पाश्चिमात्य देशांत आपली कामवासना भागवण्यासाठी सेक्स डॉलचा वापर केला जातो. (वाचा - VIDEO: अरे हे काय! मच्छीमाराला माशाच्या पोटात मिळाली Whisky ची बॉटल) टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, आपला हा अनुभव तानाका नात्सुकीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तिनी लिहिलंय, ‘मी जेव्हा माझा फिशिंग व्हिडीओ शूट करत होते तेव्हा मला पाण्यात एक मृतदेह तरंगत आला आहे असं वाटलं, पण ती एक डच वाईफ निघाली. मला असं वाटतं की कुणाचातरी गैरसमज झाला आणि त्याने सरकारी अधिकाऱ्यांना फोन केला. त्यामुळे पोलीस (Police), फायर ट्रॅक (Fire Track) आणि अॅम्ब्युलन्स (Ambulance) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिला वाचवलं हे बरं झालं.’ सेक्स डॉलच्या रेस्क्युचा हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर झाल्यानंतर प्रचंड व्हायरल (Viral Video on internet) झाला. त्यावर अनेक प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. जपानमधली सरकारी यंत्रणा इतकी जबरदस्त आहे की कुणाचाही फोन आल्यावर तातडीने मदतीसाठी दाखल होते. या घटनेमध्ये सेक्स डॉल निघाली ही गोष्ट ठीक आहे पण एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काही क्षणांत तिथं दाखल होते हेही महत्त्वाचं आहे. जगभरातील लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
First published: