जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 7 दिवसात 300 कंपन्यांकडून रिजेक्शन; बेरोजगार तरुणाने लढवली भन्नाट आयडिया, आता गावभर चर्चा

7 दिवसात 300 कंपन्यांकडून रिजेक्शन; बेरोजगार तरुणाने लढवली भन्नाट आयडिया, आता गावभर चर्चा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

बेरोजगार व्यक्तीला (Unemployed Man) नोकरी (Job) मिळविण्यासाठी काय काय करावं लागतं. मात्र या तरुणाने तर कमालच केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

आयरलँड, 3 सप्टेंबर : बेरोजगार व्यक्तीला (Unemployed Man) नोकरी (Job) मिळविण्यासाठी काय काय करावं लागतं. मात्र आयरलँडच्या उत्तरेकडील तरुणाने असं काही केलं आहे की, आपण याचा विचारही करू शकत नाही. विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर क्रिस हार्किन नावाचा तरुण ठिकठिकाणी नोकरी शोधत होता. त्याने अनेक ठिकाणी अप्लाय केलं मात्र तरीही त्याला नोकरी मिळू शकली नाही. त्याला एक आठवड्यात तब्बल 300 ठिकाणांहून रिजेक्शन मिळालं. मग मात्र त्याने नोकरी शोधायची वेगळील शक्कल लढवली. याबद्दल तुम्ही कधी विचारही करू शकत नाही. (Rejection from 300 companies in 7 days Unemployed youths solid idea) शहरभर लावले होर्डिंग मिरर यूकेमधील वृत्तानुसार, वारंवार नोकरीसाठी अप्लाय करून वैतागलेल्या तरुणाला एकाच आठवड्यात 300 रिजेक्शनचा सामना करावा लागला. वारंवार रिजेक्ट (Reject) होत असल्याने त्याने भारी कल्पना लढवली. त्याने नोकरी मिळवण्यासाठी शहरभर होर्डिंग (Billboard) लावले. यासाठी त्याने £ 400 म्हणजे तब्बल 40 हजार रुपये खर्च केले. या बोर्डावर त्याने आपल्या फोटोसह लिहिलं आहे की, ‘प्‍लीज हायर मी’ (Please Hire me). म्हणजे मला कामावर घ्या. या बिलबोर्डावर तरुणाने स्वत:विषयी 3 पॉइंट्स लिहिले आहेत. हे ही वाचा- याला म्हणतात जिद्द! नोकरी करताना तब्बल 7 तास करायचे अभ्यास; डॉक्टर नंतर झाले IAS अशी सुचली कल्पना जॉब मिळविण्यासाठी होर्डिंग वा बिलबोर्ड लावण्याची ही आयडीया क्रिसला आपल्या बहिणीसोबत चर्चा करीत असताना सुचली. त्याची बहीण सोशल मीडिया मॅनेजर आहे आणि एका कॅम्पेनसाठी बिलबोर्ड लावण्यावर काम करीत होती. दुर्देव म्हणजे बिलबोर्डासाठी 40 हजार रुपये खर्च करून देखील तरुणाला नोकरी काही मिळाली नाही. याबद्दल क्रिसने सांगितलं की, 2 वर्षांपासून नोकरीचा शोध घेत आहे. मात्र काहीच हाती न आल्यामुळे मी निराश झालो होतो. यावेळी मला बिलबोर्ड तयार करण्याची आयडिया आली आणि मी त्यावर काम सुरू केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात