Home /News /career /

याला म्हणतात जिद्द! नोकरी करतानाच तब्बल 7 तास करायचे अभ्यास; डॉक्टर असूनही आले IAS

याला म्हणतात जिद्द! नोकरी करतानाच तब्बल 7 तास करायचे अभ्यास; डॉक्टर असूनही आले IAS

ध्येय गाठण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करणाऱ्या एका डॉक्टर आणि IAS ऑफिसरची यशोगाथा (Success story of IAS Officer) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: Success म्हणजेच यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी अखंड परिश्रम (Hard Work) करावे लागतात आणि मनात काही तरी करून दाखवण्याची जिद्द असावी असावी लागते. हे सर्व करण्याची क्षमता तुमच्यात असेल तुम्ही यश खेचून (How to be Successful) आणू शकता. ध्येय गाठण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करणाऱ्या एका डॉक्टर आणि IAS ऑफिसरची यशोगाथा (Success story of IAS Officer) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. UPSC ही जगातील सर्वात कठीण परीक्षा जिद्दीनं पास केलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी तुम्ही ऐकलीच असेल. मात्र एक IAS ऑफिसर असेही आहेत जे डॉक्टर असतानाही जिद्दीनं IAS झाले आहेत. ही यशोगाथा आहे IAS नागार्जुन गौडा (Success Story of Nagarjuna Gauda) यांची. नागार्जुन गौडा यांचा जन्म कर्नाटकातील (Karnataka) एका गावात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होती, तरीही त्यांनी कठोर अभ्यास केला. इंटरमीडिएटनंतर त्यांनी MBBS ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी MBBS मध्ये प्रवेश घेतला. MBBS नंतर त्यांनी एक हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी अचानक UPSC (UPSC Exam Preparation) करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - Amazonच्या नव्या CEOची मोठी घोषणा! जगभरातील 55,000 लोकांना जॉब देणार कंपनी; लवकरच सुरु होणार जॉब फेअर मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, घरात ते सोडून कोणीही कमावणारे नव्हते. अशा परिस्थिती नोकरी सुरु ठेऊन UPSC करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. नोकरीबरोबर तयारी करणं सोपं नव्हतं पण नागार्जुननं हार मानली नाही. रोज सुमारे 6 ते 8 तास काढून नागार्जुन यांनी नोकरीसह अभ्यास केला. प्लॅनिंग आणि रणनितीच्या भरवश्यावर त्यांनी नोकरीबरोबरच UPSC ची तयारी केली आणि परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली. जर तुम्हाला UPSC करायचं असेल तर तुम्ही नोकरी करूनही तयारी करू शकता आणि कोचिंगशिवाय यश मिळवता येते. फक्त त्यासाठी स्मार्ट काम, मेहनत आणि संयमानं तयारी करण्याची गरज असते.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Ias officer, Success stories

    पुढील बातम्या