नवी दिल्ली, 13 डिसेंबर: कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला ऑनलाईन किंवा डिजिटल वर्ल्डचं (Digital) महत्त्वं पटवून दिलं आहे. ऑनलाईन शिक्षण (Online education) असो वा ऑनलाईन नोकरी (Online Jobs) आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन होतात. त्यात आजकाल प्रत्यक्षात कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा उमेदवार ऑनलाईन कोर्सेसला (Best online courses) अधिक महत्त्वं देतात. याच ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्त्न केले जात आहेत. जास्तीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्किल्स कोर्सेस (Skill courses online) करून साक्षर आणि स्किल्ड व्हावं हा यामागचा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. ऑनलाइन शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) आवश्यक नियमावली अधिसूचित केली आहे. ज्यामध्ये विद्यापीठांना संपूर्ण ऑनलाइन प्रोग्राम ऑफर करण्याची सुविधा मिळणार आहे. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना कोर्सेस Online करता येणार आहेत. UGC ने SWAYAM (Study Webs of Active Learning for Young Aspiring Minds) रेग्युलेशन्स, 2021 (SWAYAM Regulations 2021) द्वारे ऑनलाइन लर्निंग कोर्सेससाठी क्रेडिट फ्रेमवर्क तयार केलं आहे. यानुसार एका सेमिस्टरमध्ये एका विशिष्ट प्रोग्राममध्ये ऑफर केल्या जाणार्या एकूण अभ्यासक्रमांपैकी 40% अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे. SWAYAM द्वारे ही ऑनलाईन कोर्स (SWAYAM Online courses) घेतले जाणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन कोर्सेस करू इच्छिणाऱ्या किंवा पार्ट टाइम कोर्सेस (Part Time Courses) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. देशात निम्म्याहुन अधिक ग्रॅज्युएट्स Unskilled; इंडिया स्किल रिपोर्टमध्ये खुलासा उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये नावनोंदणी वाढवण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजले आहेत, ज्यात इतर गोष्टींबरोबरच अधिक केंद्रीय अर्थसहाय्यित संस्था उघडणे, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान (RUSA) योजनेद्वारे राज्य सरकारांकडून संस्था उघडण्यास प्रोत्साहन देणे, खर्चाला पूरक शिष्यवृत्ती कार्यक्रम यांचा समावेश आहे. शिक्षण, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञान-स्वयं पोर्टलचा वापर. केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, गेल्या काही वर्षांत सकल नोंदणी प्रमाण (GER) 2014-2015 मध्ये 24.3% वरून 2019-2020 मध्ये 27.1% पर्यंत वाढले आहे.
To promote online education, the UGC has notified necessary regulation, which facilitates the universities to offer full-fledged Online Program. The information was given by the MoS @Drsubhassarkar in a written reply in LS today.
— Ministry of Education (@EduMinOfIndia) December 13, 2021
Click https://t.co/ULDkcrnFi9
UGC नं जारी केली कोर्सेसची यादी जानेवारी, 2022 सेमिस्टरसाठी ऑफर केल्या जाणार्या अभ्यासक्रमांची (courses list for SWAYAM 2022) यादी विद्यार्थ्यांना www.uge.ac.in वर उपलब्ध आहे. किंवा https://swayam.gov.in या SWAYAM च्या पोर्टलवर देखील पाहता येणार आहे.