जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आता जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा फक्त 2 तासात; ही आहे स्पेशल फ्लाइट

आता जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा फक्त 2 तासात; ही आहे स्पेशल फ्लाइट

सुपरसोनिक जेटचा प्रतीकात्मक फोटो - ट्विटर

सुपरसोनिक जेटचा प्रतीकात्मक फोटो - ट्विटर

आता असं खास विमान तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे तुमचा परदेश प्रवासही काही तासात होईल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जुलै : राज्यातल्या राज्यात किंवा देशांतर्गत प्रवासा त विमानाने काही तासात पोहोचता येतं. पण असे काही देश जिथं जायचं असेल तर विमानानेही किमान एक पूर्ण दिवस तर जातोच. पण आता जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही फक्त दोन तासात पोहोचाल. आता असं खास विमान तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे तुमचा परदेश प्रवासही काही तासात होईल. सामान्यपणे मुंबईतल्या मुंबईत फिरायचं म्हटलं तरी दोन तास सहज जातात. पण याच वेळात तुम्ही परदेशात पोहोचू शकता, असं कुणी सांगितलं तर साहजिकच यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात शक्य झालं आहे. ते सबर्बिटल फ्लाइट्सने. अनेक कंपन्या अशी विमानं उतरनण्याच्या तयारीत आहेत.  ही सबर्बिटल फ्लाइट्स  काय आहे पाहुयात. जगातील पहिलं सुपरसॉनिक व्यावसायिक विमान कॉनकॉर्ड तुम्हाला आठवत असेल. ध्वनीच्या दुप्पट गती असलेले हे विमान न्यूयॉर्क ते लंडनला 3 तासांपेक्षा कमी वेळात नेऊ शकतं. त्याचा वेग ताशी 2172 किलोमीटर होता. पण त्याच्या देखभालीचा खर्च एवढा जास्त होता की तो सांभाळणं कठीण होत होते. दरम्यान, 2000 मध्ये एक हायप्रोफाईल अपघात झाला आणि त्याचं ऑपरेशन थांबवण्यात आलं. आता जवळपास 20 वर्षांनी त्याचाच मुलगा परत येत आहे. नासाने याला X-59 असं नाव दिलं आहे, ज्याचा वेग कॉनकॉर्डपेक्षा कमी असेल. याशिवाय ब्रिटीश विमान वाहतूक तज्ज्ञ अशा विमानाची कल्पना करत आहेत, जे 2 तासांपेक्षा कमी वेळात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचेल. त्याचा वेग आश्चर्यकारक असेल. Jugaad Video : प्रवासात सोबत ठेवा फक्त एक बटाटा; वाचतील कित्येक जीव अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सुपरसॉनिक विमान X-59 ची घोषणा केली होती, ज्याला कॉनकॉर्डचा पुत्र म्हटलं जात आहे. एजन्सीनं सांगितलं होतं की, लवकरच हे विमान पहिलं उड्डाण घेईल. कॉनकॉर्डपेक्षा लहान, हळू आणि ताशी 1500 किलोमीटर वेगाने हे विमान न्यूयॉर्क ते लंडन प्रवासाचा वेळ सुमारे 3:30 तासांनी कमी करेल. पण ब्रिटनच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या (सीएए) अहवालात असे काही प्रयोग केले जात आहेत, ज्यामुळे प्रवासाचा वेग अनेक पटींनी वाढेल. लंडन ते सिडनी हे दोन तासांपेक्षा कमी वेळात पोहोचू शकते. सध्या लंडनहून सिडनीला जाण्यासाठी 22 तास लागतात. तज्ज्ञांनी सध्या याला सबऑर्बिटल फ्लाइट्स असं नाव दिलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, सबऑर्बिटल फ्लाइट्स जेफ बेझोसच्या ब्लू ओरिजिन आणि रिचर्ड ब्रॅन्सनच्या व्हर्जिन गॅलेक्टिक जेट प्रोग्रामद्वारे तैनात केलेल्या रॉकेटसारख्या असतील. ते 3500 मैलांच्या वेगाने म्हणजेच 5632 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करू शकणार आहे. म्हणजेच तुम्ही न्यूयॉर्क ते शांघाय फक्त 39 मिनिटांत पोहोचू शकाल. आता यास 15 तास लागतात. न्यूयॉर्क ते लंडन हा प्रवासही एका तासापेक्षा कमी वेळात पूर्ण करता येतो. असा अंदाज आहे की सबर्बिटल फ्लाइट्स 2 तासांच्या आत पृथ्वीवर कुठेही पोहोचू शकतात. प्लेनचं असं तिकीट, एकदा खरेदी केल्यावर लाइफटाइम जगभर विमान प्रवास FREE न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, यामुळेच एलन मस्क आणि इतर व्यावसायिक स्पेस टुरिझमच्या पुढे सुपरसॉनिक फ्लाइटच्या क्षेत्रात काम करत आहेत. 2020 मध्ये, SpaceX ने त्याच्या स्टारशिप रॉकेटसाठी योजना उघड केल्या. तेव्हा असं सांगण्यात आलं की हे विमान एका तासापेक्षा कमी वेळेत 100 प्रवाशांना एका खंडातून दुसऱ्या खंडात नेण्यास सक्षम असेल. अलीकडेच, स्पेस ट्रान्सपोर्टेशन या चिनी कंपनीने आपल्या पंख असलेल्या रॉकेटच्या चाचणीची घोषणा केली. त्याचं पहिले उड्डाण 2024 मध्ये होईल आणि पुढील वर्षी ते क्रूसोबत प्रवास करेल. 2018 मध्ये प्रक्षेपित केलेले Tianxing I अंतराळयान सुमारे एका तासात 4,300 मैलांचा प्रवास करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात