नवी दिल्ली 09 जानेवारी : सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. विविध प्रकारच्या प्राण्यांच्या भांडणाचे किंवा लढाईचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही उंदरांची लढाई पाहिली आहे का? मांजरांना पाहून उंदीर पळून जातात, कारण ते एकमेकांचे शत्रू मानले जातात. मात्र काहीवेळा त्यांच्यात भांडणही पाहायला मिळतं.
फिशिंग करतानाच माशाने व्यक्तीवर केला जबर हल्ला, शेवटपर्यंत सोडलंच नाही..भयानक VIDEO
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मांजर आणि उंदराची नाही, मात्र दोन उंदरांचीच लढाई पाहायला मिळते. त्यांचा हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, जणू आता ते एकमेकांचा जीव घेतील. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका किराणा मालाच्या दुकानात वरच्या रॅकवर दोन उंदीर आपसात भिडले आहेत. उड्या मारून ते दोघंही एकमेकांवर हल्ला करत आहेत. अशी मजेशीर लढाई तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.
*किराणे की दुकान पर झगडा* 😝 pic.twitter.com/G6BQFfVDLV
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) January 7, 2023
उंदरांच्या या मजेदार भांडणाचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. किराणा मालाच्या दुकानात भांडण, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. अवघ्या 45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लाईकही केला आहे.
Viral Video : समुद्रात माशांचे हाल होतानाचे व्हिडीओ पाहून म्हणाल… प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे
नेटकरी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही जण 'ही फनी मारामारी आहे' असं म्हणत आहेत, तर एकाने म्हटलं, की 'मी आणि माझा धाकटा भाऊ चित्रपट बघून असे भांडायचो'. इतरही अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.