जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - बॅगऐवजी कुकर-सूटकेसमधून पुस्तकं घेऊन जात आहेत कॉलेज विद्यार्थी; नेमकं प्रकरण काय?

VIDEO - बॅगऐवजी कुकर-सूटकेसमधून पुस्तकं घेऊन जात आहेत कॉलेज विद्यार्थी; नेमकं प्रकरण काय?

VIDEO - बॅगऐवजी कुकर-सूटकेसमधून पुस्तकं घेऊन जात आहेत कॉलेज विद्यार्थी; नेमकं प्रकरण काय?

कॉलेजमध्ये घरगुती सामानांमधून कॉलेजच्या वस्तू नेत आहेत विद्यार्थी.

  • -MIN READ Tamil Nadu
  • Last Updated :

चेन्नई, 30 मार्च :  शाळा असो वा कॉलेज आपण बॅगेतून पुस्तकं घेऊन जातो. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात विद्यार्थी बॅगेतून नव्हे तर कुकर-सूटकेसमधून पुस्तंक नेत आहेत. हे विद्यार्थी कॉलेजचे आहेत. भारतातीलच एका कॉलेजचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं आहे. पण कुकर-सूटकेसमधून पुस्तकं नेण्यातं कारण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या या व्हिडीओने सर्वंच लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्हाला विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बॅग दिसणार नाही किंवा हातात पुस्तकं दिसणार नाही. तर त्यांच्याकडे कूकर, सूटकेस, लाँड्री बॅग अशा घरगुती वस्तू आहेत.  या वस्तू त्यांनी फक्त कॉलेजमध्ये नेल्या नाहीत. तर त्यात त्यांनी आपल्याला कॉलेमध्ये लागणाऱ्या आवश्यक वस्तू ठेवल्या आहेत. म्हणजे पेन, पुस्तकं हे सर्व त्यांनी या घरगुती वापरातील वस्तूंच्या आत ठेवलं आहे. हे फनी बिलकुल नाही! भरमंडपात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की VIDEO पाहून नेटिझन्स संतप्त पण विद्यार्थ्यांनी असं नेमकं का केलं आहे? बॅगेऐवजी असं घरगुती सामान नेण्याची गरज त्यांना का पडली? असा प्रश्न तुम्हालाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडला असेल.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ तामिळनाडूमधील चेन्नईच्या वुमेन्स क्रिश्चयन कॉलेजमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. या कॉलेजमध्ये नो बॅग डे होता. म्हणजे या दिवशी बॅग आणायची नव्हती. बॅगेऐवजी दुसरं काहीतरी आणायचं होतं आणि कॉलेजमध्ये लागणाऱ्या वस्तू त्यातूनच आणायच्या होत्या. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या कॉलेजचे दिवस आठवल्या आहेत. त्यांनी आपल्या कॉलेजमधील अशा अनो हटके दिनाबाबतही सांगितलं आहे.

जाहिरात

असा डे तुमच्या कॉलेज किंवा ऑफिसमध्ये असेल तर तुम्ही बॅगऐवजी काय घेऊन जाल आणि तुमच्या कॉलेजमध्ये असा कोणता हटके डे होता, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात