मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वातंत्र्यदिनाआधी झालेल्या श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याचा थरारक VIDEO समोर

स्वातंत्र्यदिनाआधी झालेल्या श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याचा थरारक VIDEO समोर

श्रीनगरमधील नौगाम परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंत गोळीबार केला होता.

श्रीनगरमधील नौगाम परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंत गोळीबार केला होता.

श्रीनगरमधील नौगाम परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंत गोळीबार केला होता.

  • Published by:  Kranti Kanetkar

श्रीनगर, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाआधी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद तर तीन जखमी झाले आहेत. या तीन जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट आहे.

श्रीनगरमधील नौगाम परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंत गोळीबार केला होता. ज्यामध्ये तीन जवान जखमी झाले तर दोन जवान शहीद. या दहशतवादी हल्ल्यामागील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आधीच गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट मिळाल्यामुळे पोलीस आणि जवान सतर्क होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हे वाचा-LOC ते LAC भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना PM मोदींचा सूचक इशारा

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दहशतवादी बंदूक घेऊन जात आहे आणि गोळीबार करून पळून जात असताना दिसत आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पोलीस आणि जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला करण्याचा मोठा कट दहशतवाद्यांचा होता, मात्र तो जवानांनी उधळून लावला आहे. उरी सेक्टमध्ये काही दारूगोळा आणि शस्रास्र असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यानुसार 11 ऑगस्टपासून शोध मोहीम सुरू होती. 13 ऑगस्टला पाकिस्तानी चलन, दारुगोळा, AK 73, 2 डिटोनेटर, 15 ग्रेनेड्स आणि शस्रास्रांचा मोठा साठा जवानांनी जप्त केला.

आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि चीनला सूचक इशारा दिला आहे. भारताच्या सीमारेषा आणि देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना जशास तसं सडेतोड उत्तर दिलं आहे असं मोदी म्हणाले आहेत.

First published:

Tags: Indian army, Srinagar