दाट धुक्यामुळे सोमवारी मोठा अपघात झाला. धुक्यामुळे एकावर एक, आठ गाड्या एकमेकांवर धडकल्या. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहे. (Source: News18)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) यमुना एक्सप्रेसवेवर (Yamuna Expressway) वायू प्रदूषणामुळे झालेल्या धुक्यामुळे, हा भीषण अपघात (Accident) झाला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी आगरा येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केलं आहे.
पोलीस अधिकारी विनित जैसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास, धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांकडून मदतकार्य सुरू करण्यात आलं.
दरवर्षी धुक्यामुळे अशाप्रकारे अनेक अपघात होतात. मागील वर्षी धुक्यामुळे एकाच वेळी तब्बल 24 गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला होता.
सोमवारी झालेल्या या भीषण अपघातात, जखमींची स्थिती गंभीर आहे. एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातील गाड्या क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून बाजूला करण्याचं काम सुरू आहे.