• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • सूर्याभोवती दिसलं इंद्रधनुष्याचे रिंगण; काय आहे याचा अर्थ

सूर्याभोवती दिसलं इंद्रधनुष्याचे रिंगण; काय आहे याचा अर्थ

Sun Halo: अनेकदा सूर्य (Sun) किंवा चंद्राभोवती (moon) अवकाशात गोलाकार रिंगण दिसते. त्याला 22 डिग्री हॅलो (22 Degree Halo)असं म्हणतात.

  • Share this:
बेंगळुरू, 24 मे: पाऊस पडत असताना ऊन असलं की अवकाशात विविध रंगी गोलाकार पट्टा दिसतो. अतिशय मोहक असं ते दृश्य असतं. आपण त्याला इंद्रधनुष्य (Rainbow) म्हणतो. मात्र अनेकदा सूर्य (Sun) किंवा चंद्राभोवती (moon) अवकाशात गोलाकार रिंगण दिसते. कधी ते रंगीत असते तर कधी चमकदार असते. त्याला 22 डिग्री हॅलो (22 Degree Halo) असं म्हणतात; मात्र याबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. यामुळे काहीतरी अशुभ घडणार अथवा मुसळधार पाऊस पडणार असं मानलं जातं, पण ही एक खगोल शास्त्रीय घटना असल्याचं सिद्ध झालं आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे अशा अनेक घटनांमागचे विज्ञान उलगडलेले आहे. या 22 डिग्री हॅलोचं अद्भूत दृश्य सोमवारी सकाळी बेंगळुरू (Bengaluru) येथे पाहायला मिळालं. ओपी इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, आकाशात आज सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे रिंगण दिसून आलं. अतिशय रमणीय असं ही दृश्य होतं. अनेक लोकांनी यांचे फोटो काढून ट्विटरवर शेअर केले आहेत. अत्यंत सुंदर असं ही दृश्य पाहून खूप छान वाटल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून असं दृश्य दिसत असल्याचंही एकानं म्हटलं आहे. काय आहे ही घटना ? या खगोलीय घटनेला 22 डिग्री हॅलो असं म्हणतात. कारण ही गोलाकार रिंगण सूर्य किंवा चंद्राभोवती साधारण 22 अंशांच्या व्यासाचे असते. ही वरचेवर दिसणारी सामान्य घटना असून त्याचा संबंध हवेतील बाष्पाशी असतो. बर्फाचे स्फटिक निर्माण झाल्यानं ही घटना घडते. पाऊस पडल्यानंतर हवेत पाण्याचे थेंब राहतात आणि वरच्या थरात त्याचे रुपांतर बर्फाच्या स्फटिकामध्ये होते. त्यातून प्रकाश किरणांचे आपवर्तन झाल्यानं 22 अंशांच्या व्यासाचे वलय चंद्र किंवा सूर्याभोवती दिसते. चंद्राभोवती बरेचदा असे वलय दिसते. त्याला ल्यूनार हॅलो म्हणतात. हेही वाचा- Super Blood Moon 2021 : कसं असेल यंदाचं पहिलं चंद्रग्रहण, वाचा सविस्तर अशाप्रकारचे वलय सूर्याभोवतीही दिसते. साध्या डोळ्यांनीही ही वलय दिसते. पाण्याचे थंब साठले तरी असे वलय निर्माण होते पण ते खूपच लहान आणि अधिक रंगीत असते. हे चित्र काही मिनिटांपासून तासांपर्यंतही दिसू शकते, यामुळे कुठलीही अमंगल घटना अथवा मुसळधार पर्जन्यवृष्टी होत नाही. थंड हवेच्या देशांमध्ये ही घटना वारंवार दिसून येते. मात्र भारतासारख्या उष्ण कटीबंधीय देशात ती तुलनेनं कमी दिसते.
Published by:Pooja Vichare
First published: