मराठी बातम्या /बातम्या /देश /Super Blood Moon 2021 : 26 मे रोजी चंद्र होणार लाल; यंदाचं पहिलं चंद्रग्रहण आहे एकदम वेगळं

Super Blood Moon 2021 : 26 मे रोजी चंद्र होणार लाल; यंदाचं पहिलं चंद्रग्रहण आहे एकदम वेगळं

खगोलशास्त्रीय (Astronomy) घटना आता सर्वसामान्य झाल्या असल्यातरी त्यातील काही योग अगदी अभूतपूर्व असतात. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी,चाहत्यांसाठी ही अगदी पर्वणी असते.

खगोलशास्त्रीय (Astronomy) घटना आता सर्वसामान्य झाल्या असल्यातरी त्यातील काही योग अगदी अभूतपूर्व असतात. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी,चाहत्यांसाठी ही अगदी पर्वणी असते.

खगोलशास्त्रीय (Astronomy) घटना आता सर्वसामान्य झाल्या असल्यातरी त्यातील काही योग अगदी अभूतपूर्व असतात. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी,चाहत्यांसाठी ही अगदी पर्वणी असते.

    Super Blood Moon 2021: सूर्यग्रहण (Solar Eclipse), चंद्रग्रहण (Lunar Eclipse) या खगोलशास्त्रीय (Astronomy) घटना आता सर्वसामान्य झाल्या असल्यातरी त्यातील काही योग अगदी अभूतपूर्व असतात. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी,चाहत्यांसाठी ही अगदी पर्वणी असते. अशीच एक पर्वणी येत्या 26मे रोजी अनुभवता येणार आहे.  यंदाचं पहिलं खग्रास म्हणजेच पूर्णचंद्रग्रहण (Full Moon Eclipse) 26 मे रोजी होणार असून यंदा ते अतिशय खास आहे कारण यावेळी प्रथमच सुपर मून (Super Moon), चंद्रग्रहण आणि रक्तवर्णीचंद्र (Red Blood Moon) एकाचवेळी दिसणार आहे.

    हे विशेष चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, पूर्व महासागर तसंच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. भारतात चंद्र क्षितीजाच्या खाली असल्यानं बहुतेक भागांमध्ये रक्तवर्णी चंद्र दिसणार नाही.

    सूर्य आणि चंद्राच्यादरम्यान पृथ्वी येते, तेव्हा चंद्रग्रहण होते. पृथ्वीची सावली चंद्राच्या झाकून टाकते. त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवरून परावर्तित होऊन चंद्रावर पडते आणि चंद्र चमकतो. चंद्र जेव्हा हळूहळू पृथ्वीच्या मागे जातो. तेव्हा त्याचा रंग अधिक गडद होतो आणि तांब्यासारखा म्हणजे लालबूंद दिसू लागतो. त्याच्या या लाल रंगामुळे त्याला ब्लड मून म्हणतात.

    पूर्व भारतातील काही भागातून अगदी शेवटी शेवटी चंद्रग्रहण दिसू शकेल. पूर्वेकडच्या भागात आकाशाकडे, चंद्र येण्याची वेळ येते. त्यावेळी त्यांना हा नजारा दिसेल. कोलकातामध्ये साधारण संध्याकाळी 6.15च्या सुमारास चंद्र दिसेल आणि चंद्रग्रहण समाप्त होण्यापूर्वी 6.22 मिनिटांपर्यंत म्हणजे अवघ्या काही मिनिटांसाठी ते दिसेल.

    चंद्रग्रहण कधी होईल?

    ज्योतिषशास्त्रानुसार,बुधवारी म्हणजेच 26मे रोजी वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात हे चंद्रग्रहण होणार आहे. दुपारी 3.15च्या सुमारास याची सुरुवात होईल आणि ते संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंत सुरू राहील.

    चंद्रग्रहणाचा कालावधी :

    ज्योतिषशास्त्रानुसार,वेधकाळ ग्रहण लागण्याच्या9 तास आधीपासून होतो,परंतु भारतात इतकयाआधीपासून हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून,या चंद्रग्रहणाचा कोणताही ग्रहणकाळ(सूतक) कालावधी राहणार नाही.

    या देशांमध्ये चंद्रग्रहण दिसेल :

    26मे रोजी होणारे चंद्रग्रहण पूर्व आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेसहऑस्ट्रेलियातून दिसेल. जपान, बांगलादेश, दक्षिण कोरिया, म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हे चंद्रग्रहण अगदी स्पष्ट आणि पूर्ण दिसेल.

    First published:

    Tags: Moon