मुंबई, 17 मार्च : काही लोकांची मुद्दामहून कुणाच्यातरी वाकड्यात घुसण्याची सवयच असते. शांत असलेल्याशी मुद्दामहून वाद घालणं, भांडणं, छेडणं यात त्यांना खूप मजा वाटतं. अशाच एका वृद्ध व्यक्तीने एका गायीलाही सोडलं नाही. शांतपणे उभ्या असलेल्या गाईला त्यांनी कारणाशिवायच मारलं (Man hit cow with stick) आणि त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याची शिक्षा या आजोबांना मिळाली (Cow attack on old man). गाय जी शांत स्वभावाची असते. गायीला देवाचं रूप मानलं जातं, तिची पूजा केली जाते. अशा शांत गाईला मारहाण करणं वृद्ध व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. या व्यक्तीला लगेच त्याच्या कर्माचं फळ मिळालं. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टंट कर्मा असं कॅपेशन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एका रस्त्यावर कडेला एक गाय शांतपणे उभी आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोन व्यक्ती आपसात बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती हातात काठी घेऊन रस्त्यावरून चालताना दिसते. चालता चालता ही व्यक्ती त्या गायीकडे पाहते. थोडा वेळ थांबते. गायीच्या जवळ जाऊन ती आपल्या हातातील काठी जोरात गाईच्या पाठीवर मारते. हे वाचा - VIDEO-वडिलांची नजर हटताच चिमुकल्याला घेऊन उडाला पक्षी; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद गाय शांत आहे, ती आपल्याला काहीच कऱणार नाही, असं या आजोबांना वाटतं. पण विनाकारण गाईला मारणं किती भारी पडू शकतं, याचा विचारही या आजोबांनी केला नसेल. एरवी गायी कधीच कुणाला दुखापत करत नाही, कुणावर हल्ला करत नाही. पण आजोबांनी विनाकारण तिच्या पंगा घेणं तिलाही आवडलेलं दिसत नाही. ती एखाद्या बैलासारखी चवताळली आणि आजोबांवर तिने हल्ला केला.
Instant karma 🙏 pic.twitter.com/oCftKB5cPY
— Susanta Nanda (@susantananda3) March 16, 2022
या व्यक्तीला तिने शिंगावर धरलं आणि हवेत उडवत धाडकन जमिनीवर आटोपलं. आजोबांना गाईने चांगलीच अद्दल घडवली. यापुढे असं काही करताना ते आधी लाख वेळा विचार करतील. हे वाचा - VIDEO-वडिलांची नजर हटताच चिमुकल्याला घेऊन उडाला पक्षी; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद व्हिडीओ पाहून युझर्स हैराण झाले आहेत. गाईला मारणाऱ्या या व्यक्तीबाबत त्यांनी संताप व्यक्त केलं आहे, तर गाईने जे केलं ते योग्यच केलं असंही म्हटलं आहे.