मुंबई, 17 मार्च : जंगल किंवा नॅशनल पार्कच्या जवळ राहणाऱ्या परिसरात वाघ, बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांनी लहान मुलांना पळवून नेऊन त्यांच्यावर हल्ला केल्याच्या बातम्या काही वेळा कानावर येतात. आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका भल्यामोठ्या पक्ष्याने एका लहान मुलावर हल्ला केला आहे. मुलाला घेऊन हा पक्षी हवेत उडाला. हे संपूर्ण भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं (Eagle Flying With Child). वडिलांसोबत पार्कमध्ये खेळायला आलेल्या या मुलावर त्याच्या वडिलांची नजर हटताच एका पक्ष्याने हल्ला केला. मुलाला घेऊन हा पक्षी जमिनीपासून आकाशात उंच भरारी घ्यायला गेला. थरकाप उडवणारं असं हे दृश्य आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती आपल्या लहान मुलाला घेऊन पार्कमध्ये खेळण्यासाठी आली. मुलगा जमिनीवर बसला आहे. त्याच्यापासून काही अंतर दूर त्याचे वडीलबॅगेत काहीतरी सामान शोधत आहेत. त्याचवेळी एक भलामोठा पक्षी तिथं येतो आणि त्या मुलाला आपल्या दोन्ही पायात धरतो. त्याला घेऊन तो उडतो. हे वाचा - कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO; पहिल्यांदाच हरणाऐवजी चित्त्याची कीव येईल तो आकाशात उंच जाणार तोच मुलाच्या वडिलांची त्याच्यावर नजर पडते आणि ते पक्ष्याच्या तावडीतून आपल्या लेकाला सोडवण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटतात.
त्यावेळी पक्षीही घाबरतो आणि तो त्या मुलाला सोडून देतो. पक्षी फार उंच गेलेला नसतो. जमिनीपासून काही अंतरावरच असतो. जसा तो मुलाला सोडतो तसा मुलगा जमिनीवर पडतो. पण अंतर फार नसल्याने मुलाला काही होत नाही. त्याचे वडील त्याच्याजवळ जातात आणि त्याला आपल्या कुशीत घेतात. हे वाचा - पाण्यात जात बिबट्याने घेतला मगरीसोबत पंगा; शिकारीचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.