नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी अजगरानं वासराला गिळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. तर दुसरीकडे मुंबईत एक अजगर कारमध्ये अडकल्यानं आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. त्यानंतर आणखीन एक अजगरानं केलेल्या शिकारीचा अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की या भल्यामोठ्या अजगरानं कुत्र्याची शिकार केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांनमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या श्वानाला अजगरानं आधी वेटोळं करून त्याचा श्वास घोटला आणि नंतर त्याला गिळंकृत करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली
हे वाचा-ऑनलाइन बैठक टाळण्यासाठी महिला नेत्यानं लढवली शक्कल पण...काय घडलं पाहा VIDEO
हिमाचल प्रदेशाच्या कांगडा परिसरातील या विशाल अजगरानं पाळीव श्वानाला शिकार केलं. या घटनेमुळे परिसरात अजगराची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी मोठ्या हिमतीनं अजगराच्या तावडीतून श्वानाची सुटका केली मात्र त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी सर्पमित्राला बोलवून या अजगराला पकडलं आहे. ग्रामस्थांनी अजगराला वनविभागाच्या ताब्यात दिल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला.