ऑनलाइन बैठक टाळण्यासाठी महिला नेत्यानं लढवली शक्कल पण...नेमकं काय घडलं पाहा VIDEO

ऑनलाइन बैठक टाळण्यासाठी महिला नेत्यानं लढवली शक्कल पण...नेमकं काय घडलं पाहा VIDEO

एका छोट्या चुकीमुळे महिला नेत्यानं केलेली चिटींग लक्षात आली आणि पुढे काय घडलं पाहा VIDEO

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : कोरोनाचं महासंकट असल्यानं अनेक जणांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं. त्यामुळे कामासंदर्भात मीटिंग ही ऑनलाइन अॅपवर होते. कोरोनाव्हायरसमुळे, जगभरातील कंपन्या कार्यालयातून किंवा घरातून काम करायला सांगण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या राजकीय बैठकाही कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन घेतल्या जात आहेत. अशीच एक बैठक सुरू असताना धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत असताना एका महिला नेत्यानं बैठकीतून पळ काढण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. ऑनलाइन बैठकीदरम्यान या महिला नेत्यानं झूमवर आपला फोटो लावून गायब झाल्याची घटना समोर आली. बैठकीतून जाण्यासाठी या महिला नेत्यानं नामी शक्कल वापरली आहे. आपला फोटो कॅमेरा फ्रेममध्ये झूम कॉन्फरन्स सुरू असताना लावला जेणेकरून लोकांना वाटेल आपण उपस्थित आहोत. ही महिला नेता मीटिंगमधून उठून जाताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना मेक्सिकोमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. मेक्सिकोतील काँग्रेसच्या नेत्यांनी ही बैठक घेतली त्यावेळी हा प्रकार घडल्याचं समोर आलं.

हे मेक्सिकोतील नेता व्हॅलेन्टिना बत्रे ग्वादरमा यांनी हा प्रकार केला. त्या मेक्सिकोतील मुरेना पार्टीच्या नेत्या आहेत. शुक्रवारी मेक्सिकोच्या संसदेचे ऑनलाइन अधिवेशन होत होते. त्यावेळी अनेक नेते झूम व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्कात होते. यावेळी व्हॅलेन्टिना या देखील झूमवरून या ऑनलाइन सत्रात जॉइन झाल्या. त्याच दरम्यान नेत्यांचे छोटो लाईव्ह व्हिडीओ येत असताना व्हॅलेन्टिना यांनी संधी साधून आपला फोटो झूमवर लावला आणि त्या सत्रातून उठून गेल्या. मात्र ही घटना कॅप्चर झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा फोटो लावताना त्यांची थोडी गडबड झाली आहे त्या बैठकीतून निघून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. दरम्यान या व्हिडीओमुळे त्यांची ही फसवणूक पकडली गेली आणि संसदेच्या ऑनलाइन सत्रात मोठी खळबळ उडाली. आतापर्यंत हा व्हिडीओ 63 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 23, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या