जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : अंडी उचलण्याचा प्रयत्न करत होता व्यक्ती; अजगराच्या मादीने थेट अंगावर झेप घेतली अन्..

Viral Video : अंडी उचलण्याचा प्रयत्न करत होता व्यक्ती; अजगराच्या मादीने थेट अंगावर झेप घेतली अन्..

व्यक्तीने घेतला अजगरासोबत पंगा

व्यक्तीने घेतला अजगरासोबत पंगा

तो माणूस अंडी उचलायला जातो, तशी ती अजगराची मादी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पण…

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली 24 जून : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ पाहून नेटकरीही घाबरतात. ‘Zookeeper Jay Brewer’ नावाचं एक इन्स्टाग्राम अकाउंट आहे. हे अकाउंट त्यावरच्या असामान्य व्हिडिओजसाठी ओळखलं जातं. या अकाउंटवर शेअर केलेल्या क्लिप्स वेगवेगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी, विशेषत: सापांशी संबंधित असतात. नुकत्याच शेअर झालेल्या एका व्हिडिओत अजगराची मादी चवताळलेली असल्याचं पाहायला मिळत आहे. “या सुंदर अजगराने अंडी घातली! अंडी वाचवताना अजगर हल्ला करतात. परंतु ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, जी स्वीकारण्यास मी तयार आहे” असं कॅप्शन व्हिडिओ ला देण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती अजगराची मादी आणि तिच्या अंड्यांसमोर उभी असल्याचं पाहायला मिळतं. प्रत्येक वेळी जेव्हा तो माणूस अंड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मादी त्याच्यावर धावून येते आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करते. बाईक चालवत आलं अन् चिमुकलीला उचलून नेलं; माकडाने केलं अपहरण? Video पाहून हादराल खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यावर कुणालाही भीती वाटेल. एवढा मोठा अजगर आणि त्याची अंडी व्हिडिओत पाहायला मिळतात. तो माणूस अंडी उचलायला जातो, तशी ती अजगराची मादी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पण तरीही तो ती अंडी उचलतो.

    जाहिरात

    एका दिवसापूर्वीच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, एका दिवसात व्हिडिओला जवळपास पाच लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त व्हिडिओला 20 हजारांहून अधिक लाइक्सदेखील मिळाले आहेत. युझर्स मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअरही करत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. ‘मादा अजगर म्हणाली, ‘मी तुला माझ्या न जन्मलेल्या बाळांना हात लावण्यापासून रोखत होते ना? तुम्ही माणसं कधीच ऐकत नाही!!’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘तुला किती वेळा अजगराने चावा घेतला आहे? ते विषारी असतात का?’ असे प्रश्न दुसऱ्या एका युझरने विचारले आहेत. त्यावर, ब्रेव्हरने उत्तर दिलं, ‘मला अनेकदा साप, अजगर चावले आहेत आणि आता मी ते मोजणंही विसरलो आहे.’ ‘आपल्या पिल्लांचं संरक्षण करणारी पायथन आई,’ अशी कमेंट आणखी एका युझरने केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात