मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: वेगवान बैलजोडीनं उडी मारत वाचवलं मालकाला, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य

VIDEO: वेगवान बैलजोडीनं उडी मारत वाचवलं मालकाला, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य

बैलगाडा शर्यतीतील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (viral on social media)  होता आहे.

बैलगाडा शर्यतीतील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (viral on social media) होता आहे.

बैलगाडा शर्यतीतील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (viral on social media) होता आहे.

पुणे, 05 एप्रिल: सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) राज्यात बैलगाडा शर्यतींना (bullock cart races)सशर्त परवानगी दिली आहे. परवानगी दिल्यानंतर बैलगाडी मालकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. यानंतर राज्यातल्या अनेक भागांमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे. त्याच दरम्यान बैलगाडा शर्यतीतील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (viral on social media) होता आहे. नशिब बलवत्तर म्हणून बैलगाडा घाटात घोडीवरून खाली पडलेल्या एक घोडेस्वार थोडक्यात बचावला आहे.

पुण्यातील (Pune) जुन्नरमध्ये बैलगाडी शर्यत सुरु झाल्यानंतर एक अपघात घडला. मात्र नशिब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आणि तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. बैलगाडा घाटात शर्यत सुरु असताना मालक समोरुन धावत असलेल्या घोडीवरुन खाली पडला, मात्र मुक्या प्राण्यांनीच मालकाचे प्राण वाचवल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय तर तब्बल तीन वेळा बैलांच्या आणि घोड्याच्या पायाखाली येऊन सुद्धा हा तरुण थोडक्यात बचावला आहे.

कधीच पाहिलं नसेल असं नवरा-बायकोचं भांडण सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO च्या शेवटी आहे मोठा ट्विस्ट 

मुक्या प्राण्यांचे मालकावर किती प्रेम आहे याचा प्रत्यय या व्हिडिओमधून येतोय..घोडीवरून पडलेल्या तरूणाला मागून येणाऱ्या बैलांनी न तुडवता उंच उडी मारून अलगदपणे वाचवलं आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे.

हे घडताच या तरुणानं स्वतःला वाचवत बाजूला पळ काढला. हा सगळा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये सुरु असलेल्या बैलगाडा शर्यतीत ही घटना घडली आहे. बैलगाडा घाटात शर्यत सुरु होती. त्याचवेळी पुढे धावणाऱ्या घोडीवरुन बैलगाडा मालक खाली कोसळला. त्यामागून बैलजोडी वेगानं धावत येत होती.

मुक्या प्राण्यांनं वाचवला मालकाचा जीव

तीन वेळा बैलांच्या आणि घोड्याच्या पायाखाली येऊन तरुण चिरडला जाण्याची भीती होती. मात्र बैलजोडीच्या प्रसंगावधानामुळे मालक थोडक्यात बचावला. मालक समोर रस्त्यात खाली कोसळल्याचं पाहून वेगवान धावणाऱ्या बैलजोडीनं न तुडवता उडी मारुन आपलं स्पर्धा सुरु ठेवली. त्यानंतर मालक उठून उभा राहिला आणि बाजूला गेला. या संपूर्ण घटनेनं मुक्या प्राण्यांचं आपल्या मालकावर किती प्रेम आहे, याचा जीवंत एकदा प्रत्यय येते पाहायला मिळतो.

First published:
top videos

    Tags: Bull attack, Pune (City/Town/Village)