जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कधीच पाहिलं नसेल असं नवरा-बायकोचं भांडण सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO च्या शेवटी आहे मोठा ट्विस्ट

कधीच पाहिलं नसेल असं नवरा-बायकोचं भांडण सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO च्या शेवटी आहे मोठा ट्विस्ट

कधीच पाहिलं नसेल असं नवरा-बायकोचं भांडण सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO च्या शेवटी आहे मोठा ट्विस्ट

नवरा-बायको ज्यासाठी भांडताना दिसतात त्यापेक्षा खूपच वेगळं असं त्यामागील कारण आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 एप्रिल : नवरा-बायकोची भांडणं (Husband Wife Fight Video) तशी नवीन नाहीत. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पत्नी-पतीमध्ये वाद होतातच. सध्या सोशल मीडियावर अशाच नवरा-बायकोच्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जे चांगलंच चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे या भांडणात शेवटी एक जबरदस्त ट्विस्ट आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नवरा-बायकोच्या भांडणाचा कारण तसं कॉमन आहे. म्हणजे बहुतेक कपलमध्ये ज्या कारणामुळे वाद होतात तेच कारण इथेपण आहे. पण या भांडणाचा शेवट मात्र खूपच हटके आहे. असा शेवट की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. व्हिडीओत पाहू नवरा बायको ज्यासाठी भांडताना दिसतात त्यापेक्षा खूपच वेगळं असं त्यामागील कारण आहे. हे वाचा -  Oh No! Hello म्हणताच धावत आला प्राणी आणि…; महिलेला भारी पडली जंगलातील मस्ती व्हिडीओत पाहू शकता एक रेस्टोरेंट आहे. जिथं सुरुवातीला एक महिला दिसते. ती खात असताना तिच्या तोंडाला पदार्थ चिकटलेला दिसतो. तसा तो पुरुष आपल्या हातात टिश्यू पेपर घेऊन हसत तिचं तोंड पुसतो. त्यावेळी त्याची बायको तिथेच असते. हे पाहून ती भडकते आणि काहीच न बोलता रागात उठून तिथून निघून जाते. मग नवराही तिच्या मागोमाग तिला मनवायला जातो.

जाहिरात

खरा ट्विस्ट तर आता आहे. नवरा बायको बाहेर जाताच त्यांची एकी होते. ते एकमेकांना टाळी मारताना दिसतात आणि आत ज्या महिलेच तोंड पुसलं गेलं तिच्याकडे वेटर तिच्यासह त्या टेबलवर बसलेल्या दाम्पत्यही बिल आणून देतो. जे पाहूनच तिला धक्का बसतो. महिलेकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो त्यामुळे ती बिचारी सर्व बिल गुपचूप भरते. नवराा बायको खोटं भांडणाचं नाटक करून त्या महिलेला चुना लावतात. हे वाचा -  म्हणे, ‘देशाची फौज वाढवणारी देशभक्त बायको हवी’; बेरोजगार डॉक्टरची Matrimonial Ad Viral आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही मनी सेव्हर स्कीम आहे, असं मजेशीर कॅप्शनही त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यावर बर्‍याच मजेशीर कमेन्ट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात