Home /News /viral /

Video : अरे आवरा याला! बाईक चालवताना दोन्ही हातात मोबाइल; पोलीसही हैराण

Video : अरे आवरा याला! बाईक चालवताना दोन्ही हातात मोबाइल; पोलीसही हैराण

बाईक चालकाला याची शिक्षा भोगावी लागली.

    नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : बाईकवरुन जाताना अनोख्या स्टंटवर वडोदरा (Gujrat News) पोलिसांनी सक्ती दाखवली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) कैद झालेलं फुटेज समोर आल्यानंतर चालकाना इ-चलान पाठवण्यात आलं. हा व्हिडीओ अनोखा होता, कारण ती व्यक्ती बाईक चालवताना दोन मोबाइल फोन वापरत होता. व्हिडीओ (Video Viral) फुटेजमध्ये मोटरसायकलस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. दोन्ही हातात फोन घेऊन ही व्यक्ती बाईक चालवित होती. बाईक चालवताना दोन्ही हात सोडून वापरत होता मोबाइल... वडोदरा पोलिसांनी ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करीत बाइक ड्राइवरचं इ-चलान जारी करण्यात आलं. सीसीटीवी फुटेजमध्ये तरुण बाईक चालवताना दोन्ही हात सोडून फोनवर बोलत होता. ज्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करीत अॅक्शन घेतली. ही बाब केवळ त्या व्यक्तीसाठीच नाही तर इतरांसाठीच धोकादायक ठरू शकतं. व्यक्तीचा हा स्टंट धोकादायक आणि जीवघेणा आहे. यासाठी पोलिसांनी बाईक ड्रायव्हरविरोधात कडक कारवाई केली. भारतात कार वा दुचाकी चालवताना हेडफोन वापरण्याची परवानगी नाही आणि भारतीय मोटर वाहन अधिनियमअंतर्गत ड्रायव्हिंग करताना फोनचा उपयोग करणं चुकीचं आहे. हेल्मेटच्या आत इअरफोन लावणं गैरकायदेशीर... हेल्मेटच्या आत इअरफोन लावणं गैरकायदेशीर आहे. याअंतर्गत जर तुम्ही हेल्मेटच्या आत स्मार्टफोन ठेवत असाल तर पोलीस तुमच्याकडून दंड आकारू शकतात. कार चालविणारे म्युझिक सिस्टिमचा वापर करून संगीत ऐकू शकतात. मात्र तरीही कार चालक आणि दुचाकी चालविणारे हेडफोनचा वापर करू शकत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cctv footage, Gujrat, Videos viral

    पुढील बातम्या