नवी दिल्ली 19 मार्च : प्रँकचं नाव ऐकताच लोकांच्या मनात विचित्र कृत्यं करणं किंवा इतरांची चेष्टा करणं, असे विचार येतात. आजकाल प्रँकचा ट्रेंड खूप वाढला आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावर एकापेक्षा एक प्रँक व्हिडिओ पाहायला मिळतात. यूजर्स हे व्हिडिओ फक्त पाहातच नाहीत, तर एकमेकांसोबत शेअरही करतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. वळूसोबत पंगा घेत होती महिला; भोगावा लागला अतिशय भयानक परिणाम, झाली अशी अवस्था..VIDEO सहसा वाटेत कोणाला पैसे सापडले तर लोक मागे-पुढे बघून थेट खिशात टाकतात. जेणेकरून नोट लवकरात लवकर आपली होईल. तुम्हीही असे करत असाल तर सावध व्हा, कारण त्यामागे काही युक्ती किंवा प्रँक असू शकतो. आता ही क्लिपच बघा, ज्यात रस्त्यावरील नोट पाहून एका मजुराला लोभ आवरत नाही आणि तो ती नोट उचलण्याची चूक करतो. मग त्याच्यासोबत असं काही घडतं की तो आयुष्यात पुन्हा कधीच रस्त्यावरचे पैसे उचलणार नाही.
व्हिडिओच्या सुरुवातीला मजूर खांद्यावर जुना सिमेंटचा पत्रा टांगून चालताना दिसतो. दरम्यान, त्याला रस्त्यात एक नोट पडलेली दिसली. ज्याला पाहून त्याच्या मनात लोभ येतो. पण त्याच्या मनात एक भीतीही असते की त्याला कोणी पाहू नये, म्हणून तो आधी मागे वळून पाहतो. त्याच्याकडे कोणी पाहत नाही याचं पूर्ण समाधान झाल्यावर तो पैसे उचलण्यासाठी खाली वाकतो, पण त्याचवेळी प्रँक करणारा व्यक्ती त्याच्या दिशेने एक नकली साप फेकतो.
सापाला पाहून मजूर घाबरून जातो आणि त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं- ओ रे मोरी मैय्या…असं म्हणत तो जीव वाचवण्यासाठी धावतो. धावत असताना, त्याचा पाय पुन्हा अडखळतो, मात्र तो न थांबता धावतच राहतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आता तो आयुष्यात कधीच जमिनीवर पडलेला पैसा उचलणार नाही.