मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIRAL PHOTOS नं तरुणीला बनवलं सर्वाधिक लोकप्रिय व्यवसायिक, सौंदर्यावर लाखो फिदा

VIRAL PHOTOS नं तरुणीला बनवलं सर्वाधिक लोकप्रिय व्यवसायिक, सौंदर्यावर लाखो फिदा

चार्लेन जहांग नावाची तरुणी काही वर्षापूर्वी आपल्या कुटुंबीयांच्या पोर्क स्टॉलवर (Pork Stall) काम करायची. याचवेळी एका ग्राहकानं लपून तिचे काही फोटो काढले आणि हे फोटो प्रचंड व्हायरल (Photos Viral on Social Media) झाले.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 29 मे : काही वर्षांपूर्वीच पाकिस्तानातील (Pakistan) एक चहावाला आपल्या लूकमुळे प्रचंड लोकप्रिय झाला होता. तायवानमधील एका तरुणीलाही अशीच लोकप्रियता मिळाली. चार्लेन जहांग नावाची तरुणी काही वर्षापूर्वी आपल्या कुटुंबीयांच्या पोर्क स्टॉलवर (Pork Stall) काम करायची. याचवेळी एका ग्राहकानं लपून तिचे काही फोटो काढले आणि हे फोटो प्रचंड व्हायरल (Photos Viral on Social Media) झाले.

या फोटोमुळे काही दिवसातच चार्लेन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मात्र, ही प्रसिद्धी तिला नको वाटू लागली. कारण, लोक तिच्या सौंदर्यासोबतच शरीराबद्दलही कमेंट पास करत होते. चार्लेन या गोष्टीमुळेही चर्चेत होती, कारण ती एक असं काम करायची जे पुरुषप्रधान मानलं जात.

वाइस वर्ल्ड न्यूजसोबत बातचीत करताना चार्लेननं म्हटलं, की जेव्हा माझे फोटो व्हायरल झाले तेव्हा मला तरुण आणि सुंदर म्हटलं गेलं. मात्र, यानंतर मी घरातच लपून राहू लागले. कारण, मी दुकानात जाताच पत्रकार माझ्या नकळत माझे फोटो काढत असे. तिनं म्हटलं, की मला अशाप्रकारच्या अटेन्शनची सवय आणि गरज दोन्ही नव्हतं. मात्र, माझ्या मित्र-मैत्रीणींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी बातचीत केल्यानंतर मी ही लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न केला. कारण, या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा व्यवसाय आणखी वाढवण्याचा तिचा विचार होता.

चार्लेनला आपल्या कुटुंबाच्या पोर्कच्या व्यवसायात उतरायचं नव्हतं. मात्र, तिच्या आजीची तब्येत बिघडल्यानं तिला काही काळासाठी या कामात उतरावं लागलं. मात्र, लोकप्रियता मिळाल्यानंतर तिनं याच व्यवसायात कायम राहाण्याचं ठरवलं. जेणेकरुन तिच्या कुटुंबीयांनाही याचा फायदा होईल. चार्लेन आता तायवानमधील सर्वाधिक लोकप्रिय पोर्क बिजनेसमन बनली आहे.

First published:

Tags: Beauty queen, Photo viral, Viral post