मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पैसे कमावण्यासाठी मुलीनं लढवली अनोखी शक्कल; Digital Love करून झाली कोट्यधीश

पैसे कमावण्यासाठी मुलीनं लढवली अनोखी शक्कल; Digital Love करून झाली कोट्यधीश

ऑनलाईन प्रेम विकणाऱ्या या तरुणीचे नाव आहे मार्टा रेंटल (Marta Rentel) जिचे टिकटॉक वर Marti Renti या नावाने अकाउंट असून तिचे 2.4 अब्ज फॅन (Fan followers) आहेत.

ऑनलाईन प्रेम विकणाऱ्या या तरुणीचे नाव आहे मार्टा रेंटल (Marta Rentel) जिचे टिकटॉक वर Marti Renti या नावाने अकाउंट असून तिचे 2.4 अब्ज फॅन (Fan followers) आहेत.

ऑनलाईन प्रेम विकणाऱ्या या तरुणीचे नाव आहे मार्टा रेंटल (Marta Rentel) जिचे टिकटॉक वर Marti Renti या नावाने अकाउंट असून तिचे 2.4 अब्ज फॅन (Fan followers) आहेत.

मुंबई 21 जुलै21 व्या शतकात आजपर्यंत आपण अनेक अद्भूत गोष्टी पाहिल्या, ऐकल्या असतील. पण सध्या इंटरनेटवर अशाही एका गोष्टीची चर्चा सुरू आहे, ज्यावर सहजासहजी आपला विश्वास बसू शकणार नाही. आपण आजपर्यंत घर, विविध वस्तू इत्यादींची ऑनलाईन खरेदी-विक्री पाहिली असेल पण पोलंडमधील (Poland) एक तरुणीने ऑनलाईन प्रेम म्हणजे डिजिटल लव्ह विकून (Girl sells Digital Love) कोट्यवधी रुपये कमवले आहेत. प्रेम ही भावना अशी डिजिटली विकता येते का? काय आहे ही ऑनलाइन डिजिटल लव्हची विक्री जाणून घेऊया.

पोलंडमध्ये ऑनलाईन प्रेम विकणाऱ्या या तरुणीचे नाव आहे मार्टा रेंटल (Marta Rentel) जिचे टिकटॉक वर Marti Renti या नावाने अकाउंट असून तिचे 2.4 अब्ज फॅन (Fan followers) आहेत. तिने व्हर्च्युअल डिजिटल लव्हची विक्री केली आहे असं ती सांगते. या व्हर्चुअल लव्हमधून तिने 1 लाख 85 हजार पौंड म्हणजेच भारतीय किमतीत 1 कोटी 86 लाख रुपयांहून अधिक रक्कम कमवली आहे. ही रक्कम डिजिटल फॉर्ममध्ये आहे म्हणजेच ती डिजिटल संपत्ती (Digital Asset) आहे. बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी याबद्दल तुम्ही ऐकलं असेल अशाच डिजिटल करन्सी स्वरूपात मार्टाने ही संपत्ती कमावली आहे. या डिजिटल करन्सीचा वापर साधारणपणे डिजिटल आर्ट, ग्राफिक्स, म्यूजिक यासाख्या ऑनलाईन गोष्टी खरेदी करण्यासाठी करतात.

भंगारवाल्याच्या घरात कोट्यवधींचा माल; घर पाहून पोलीसही चक्रावले

नक्की काय आहे डिजिटल लव्ह?

पोलंडमधील मार्टा रेंटल या 21 वर्षाच्या टिकटॉक स्टारने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या गोष्टीचा खुलासा केला आहे की, तिने ऑनलाईन प्रेम विकून करोडो रूपये कमवले आहेत. तिनी डिजिटल लव्ह काय आहे याचा खुलासा केलेला नाही पण डिजिटल लव्ह हे ग्राफिक्स, फोटो, व्हिडिओ गेम्स, यूट्यूब, मूव्ही, गाणी आणि ऍनिमेशन्सच्या स्वरूपात असू शकतं. या स्वरूपातील कंटेटची किंवा अमूर्त वस्तूंची खरेदी- विक्री ही NFT(Non Fungible Token) स्वरूपात होते. जी फक्त डिजिटल जगापुरती मर्यादित असते. क्रिप्टोकरन्सी(Cryptocurrency) आणि बिटकॉइनप्रमाणे(Bitcoin) ही कमाईदेखील डिजिटल संपत्ती मानली जाते.

King Cobra ने दुसऱ्या कोब्राला केलं फस्त, Viral होतोय हा भीतीदायक Photo

कुणी केली खरेदी?

मार्टाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितले की, एका अनोळखी व्यक्तीने 1 कोटी पोलिश चलनामध्ये तिच्या डिजिटल लव्हची खरेदी केली आहे. ही खरेदी करणारी व्यक्ती कोण आहे हे कुणालाच माहिती नाही आणि त्याबद्दल मार्टानेही काहीही सांगितलेलं नाही. त्या व्यक्तीला प्रत्यक्षात जेवणासाठी सोबत येण्याचं आमंत्रण देणार असल्याचं मार्टाने म्हटलं आहे.

NFT म्हणजे काय?

एनएफटी म्हणजे नॉन फंगिबल टोकन (Non-Fungible Token) होय. याद्वारे डिजिटल आर्टची किंवा इतर अमूर्त गोष्टींची खरेदी-विक्री केली जाते. मार्टाचे डिजिटल लव्ह म्हणजे तिने विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला कंटेट किंवा आर्ट, ग्राफिक्स, व्हिडियो गेम, मूव्ही, गाणी आणि अनिमेशन्स आहेत असा अंदाज आहे. ज्यांची खरेदी करून त्या अनोळखी युजरने तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केलं आहे. तिच्या मते फिजिकल लव्ह आणि डिजिटल लव्ह या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्यांचे महत्त्व सारखेच आहे.

First published:

Tags: Love story, Online meetings, Video viral