नवी दिल्ली, 30 जानेवारी : अॅपल कंपनीने आयफोनच्या रुपाने स्मार्टफोन सादर केला आणि तिथून तंत्रज्ञानाच्या क्रांतीला सुरुवात झाली. या क्रांतीने पुढचे अनेक टप्पे आता गाठले आहेत. अॅपल वॉच हा त्यातलाच एक टप्पा. या अॅपल वॉचनेही तंत्रज्ञानाची मोठी कमाल वेळोवेळी दाखवली आहे. कितीतरी जणांचे प्राण या वॉचने वाचवले आहेत, मात्र या अॅपल वॉचमुळे नुकतीच अशी एक घटना घडली, की त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
ऑस्ट्रेलियातील घटना
ऑस्ट्रेलियातल्या पीटीजे ग्लॅड्सव्हिले इथली ही घटना आहे. तिथे एक जिम ट्रेनर आपल्या क्लायंटला ट्रेनिंग देत होता. तेवढ्यात अॅपल वॉचने चुकून सिरी या व्हर्च्युअल असिस्टंटला अॅक्टिव्हेट केलं आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसला पाचारण केलं. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत 15 पोलीस ऑफिसर्स तिथे येऊन दाखल झाले. त्या सगळ्यांच्या हातात बंदुका होत्या.
एक वेबसाइटने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्या वृत्तानुसार, पीटीजे ग्लॅड्सव्हिलेमध्ये एक जिम ट्रेनर आपल्या ग्राहकाला ट्रेनिंग देत होता. जिम ट्रेनरकडे अॅपलचं वॉच होतं. त्या वॉचने चुकून 'सिरी'ला अॅक्टिव्हेट केलं आणि त्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल लागला.
इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल
इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल येताच, 15 सशस्त्र पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. इमर्जन्सी सर्व्हिसला जो कॉल लागला होता, तो गन शॉट अर्थात गोळीबाराशी संबंधित होता. त्यामुळे पोलिसांना गोळीबार झाल्यासारखं किंवा त्यातून आत्महत्येसारखी घटना घडल्यासारखं वाटलं. त्यामुळे पोलीस बंदुका घेऊन तिथे पोहोचले. जिममध्ये अचानक एवढे बंदूकधारी पोलीस आल्यानंतर कोणालाच काही कळेनास झालं. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
जुन्या फोनचा यापेक्षा चांगला वापर काय असणार... एक ट्रीक आणि फोन होईल CCTV
15 पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
जिम ट्रेनरने सांगितलं, 'माझ्या समोर 15 पोलिस अधिकारी उभे होते. तसंच काही अॅम्ब्युलन्सेसही उभ्या होत्या. हे सगळं पाहून मी विचारात पडलो. हे नेमकं काय चाललंय ते कळत नव्हतं. त्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याने विचारलं, की जेमी एलेनी कोण आहे. त्यावर मी सांगितलं, की मीच जेमी एलेनी आहे. तेव्हा पोलिसांनी सांगितलं, की तुम्ही आम्हाला कॉल केला होता. पण मी कोणताही कॉल केलाच नव्हता.
View this post on Instagram
त्यानंतर बारकाईने सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर सगळा उलगडा झाला. त्यानंतर जेमीने पोलिसांना समजावून सांगितलं, की त्याने कोणताही कॉल केला नव्हता. अॅपल वॉचकडून चुकून हा अलार्म वाजवला गेला होता. सुदैवाने पोलिसांनी हे समजून घेतलं आणि त्यावर पोलिसांनी कोणतीही अॅक्शन घेतली नाही. अन्यथा जीम ट्रेनरवर पोलिसांनी कारवाई केली असती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Smartwatch