सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याबाबत काहीच सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जलद गतीने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) उत्तर प्रदेश पोलिसाच्या एका अधिकाऱ्यावर पहिल्यांदा एक तरुण आणि त्यानंतर त्याच्या मैत्रिणीवर गोळी झाडण्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की लोक हे सत्य असल्याचं मानू लागले. मात्र नेमकं काय आहे या व्हिडिओमागील सत्य? उत्तर प्रदेश पोलिसांनी एका ट्वीटमध्ये सोशल मीडियावरील वापरकर्त्यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राहुल श्रीवास्तव यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करीत लिहिलं आहे की, या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. ते म्हणाले की फॅक्ट चेक केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ हरियाणातील करनाल येथे एका कॅफेबाहेर शूट केलेल्या वेब सीरिजचा भाग आहे. खरं पाहता या व्हिडिओचा चुकीचा उपयोग केला जात आहे.
करनालस्थित फ्रेंड्स कॅफेच्या व्यवस्थापकांनी याला दुजोरा दिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आणि पोलिसांमध्ये जोरदार भांडणं होतात. ज्यानंतर पोलीस तरुणाला धक्का देतो. पोलीस आपली बंदूक काढतो आणि तरुणाच्या छातीत गोळी झाडतो. यानंतर त्याच्यासोबत असलेली मैत्रिण रडू लागते आणि तरुणाच्या शेजारी जाऊन बसते. यानंतर व्हिडिओमध्ये दिसणारा पोलीस तिच्यावरही गोळी झाडतो. हे ही वाचा- बँड-बाजासह बलात्काराच्या आरोपीच्या घरी पोहचले पोलीस, Video Viral अनेकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर प्रदेश पोलिसांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.