पत्नीने मागितला आई होण्याचा अधिकार, पती म्हणतो माझ्या देखभालीचा खर्च दे; काय आहे हा प्रकार?

पत्नीने मागितला आई होण्याचा अधिकार, पती म्हणतो माझ्या देखभालीचा खर्च दे; काय आहे हा प्रकार?

आतापर्यंत पती-पत्नीमध्ये असा वाद पाहिला नव्हता, असे अनेकांचे म्हणणे आहे

  • Share this:

भोपाल, 31 ऑक्टोबर : आतापर्यंत पत्नीने पतीकडून पोटगी किंवा देखभालीचा खर्च मागितल्याचे ऐकण्यात आलं आहे. मात्र येथे तर नवीनच प्रकार समोर आला आहे. भोपाळमध्ये कुटुंब न्यायालयात विचित्र केस समोर आली आहे. ज्यामध्ये पतीने आपल्या अधिकारी पत्नीकडे देखभालीचा खर्च मागितला आहे. फेसबुकच्या माध्यमातून प्रेम झाल्यानंतर सहा वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं होतं. पत्नी सरकारी अधिकारी आहे तर पती एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. लग्नानंतर काही दिवसात पतीचे नोकरी गेली. काही दिवसांपर्यंत पती वारेमाप खर्च करीत असल्याचे दिसल्यावर पत्नीने एटीएम ब्लॉक केलं. यादरम्यान पत्नीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र यावेळी पतीने सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर पतीने कुटुंब न्यायालयाचं दार ठोठावलं.

दोघांमध्ये सुरू असलेला छोटा वाद एटीएम ब्लॉक करणे आणि पत्नीचं न ऐकल्याने वाढला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर पत्नीने पतीकडे आई होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र येथे पती पत्नीचं ऐकून घेण्यास तयारच नव्हता. दरम्यान डॉक्टरांनी महिलेला तिचे वय पाहता (वय 40) लवकरात लवकर बाळाचा विचार करण्याचा सल्ला दिला. पती यासाठी तयार नसल्याचे पाहून तिने आयवीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) चा पर्यात निवडला. मात्र यासाठीही पतीची स्वाक्षरी आवश्यक होती. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पतीने यासाठीही नकार दिला. यावेळी तो म्हणाला की, मी तुझ्यासोबत पैशांसाठी लग्न केलं होतं. त्यामुळे मी तूला केव्हाच आईचं सुख मिळू देणार नाही. यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने कुटुंब न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पतीने पालन-पोषण खर्चाची मागणी केली. यानंतरही पती तिला म्हणाला की, आता पुढील 3-4 वर्षे कोर्ट-कचेरीत जातील आणि तुझं आई होण्याचं वय निघून जाईल. सध्या या दोघांची कौन्सिलिंग केली जात आहे.

हे ही वाचा-बेपत्ता कुत्रा सापडला पण मृतावस्थेत; विरह असह्य झाल्याने मालकानंही संपवलं आयुष्य

कायदेतज्ज्ञांनुसार पतीदेखील पत्नीकडून देखभालीचा खर्च मागू शकतो. मात्र यासाठी पती कमावू शकत नाही हे सिद्ध करावे लागेल. यावर पतीचं म्हणणं आहे की जर मी नोकरी करतो आणि पत्नीने देखभालीचा खर्च मागितला असता तर मला द्यावं लागलं असतं, तर पत्नीही मला देऊ शकते. पत्नी म्हणतो, ती अधिकारी आहे, त्यामुळे मला महत्त्व देत नाही. मला सन्मान देत नाही. या कारणाने मी कुटुंब वाढवू इच्छित नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: October 31, 2020, 6:38 PM IST

ताज्या बातम्या