जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! गेंड्यासोबत बिबट्याने असं काही केलं की पाहून नेटिझन्स थक्क; VIDEO VIRAL

OMG! गेंड्यासोबत बिबट्याने असं काही केलं की पाहून नेटिझन्स थक्क; VIDEO VIRAL

OMG! गेंड्यासोबत बिबट्याने असं काही केलं की पाहून नेटिझन्स थक्क; VIDEO VIRAL

बिबट्या आणि गेंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मार्च : बिबट्या आणि गेंडा तसे दोघंही खतरनाक प्राणी. पण त्यांची क्षमता, ताकद मात्र वेगवेगळी. बिबट्या चपळ आणि वेगवगान तर गेंडा शरीराने तितकाच अवाढव्य. असे दोन प्राणी एकमेकांसमोर आले तर काय होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अशाच बिबट्या आणि गेंड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard rhino video). बिबट्या आणि गेंडा एकमेकांच्या समोर आले त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल. बिबट्याने गेंड्यासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. बिबट्याने गेंड्यावर हल्ला केला. त्यानंतर तो तिथंच त्याचा फडशा पाडत राहिला नाही तर त्याने त्याला झाडावर नेलं. बिबट्या सिंहासारखी शिकार करतो पण तो आपली शिकार जमिनीवरच खात नाही तर तो आपली शिकार घेऊन झाडावर जातो. जेणेकरून कुणी त्याच्या शिकारीवर ताव मारणार नाही. आपल्या शिकारीचा तो एकटाच आनंद लुटतो. हे वाचा -  VIDEO - पाणघोड्याने जबड्यात धरून जमिनीवर आपट आपट आपटलं आणि…; सिंहाची कधीच पाहिली नसेल इतकी भयानक अवस्था पण गेंडा हा वजनाने, आकाराने मोठा प्राणी आता त्याला झाडावर घेऊन जाणं वाटतं तितकं सोपं नाही. पण तरी बिबट्या या गेंड्याला घेऊन झाडावर गेला.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता बिबट्याने मृत गेंड्याच्या मानेला आपल्या जबड्यात धरलं आहे. त्यानंतर आपल्या मजबूत पंजांनी तो पटापट झाडावर चढतो. गेंड्याचं वजन पेलणं थोडं त्याला अशक्य होताना दिसत आहे, पण तरी तो ते आव्हान यशस्वीरित्या पार पाडतो. हा गेंडा म्हणजे मोठा गेंडा नाही म्हणजे गेंड्याचं पिल्लू आहे. त्यामुळे बिबट्याला तसं हे शक्य झालं. हे वाचा -  Oh no! मोबाईल पाहताच उंटाला आला राग; सेल्फी काढणाऱ्या महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO wild animal shorts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनही हैराण झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात