जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : रस्त्यावर फुटबॉल खेळणं तरुणाला महागात, खेळता खेळता पडला नाल्यात

Viral Video : रस्त्यावर फुटबॉल खेळणं तरुणाला महागात, खेळता खेळता पडला नाल्यात

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी कुठून मृत्यू समोर येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर वावरताना नेहमी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 एप्रिल : आजकाल अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी कुठून मृत्यू समोर येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर वावरताना नेहमी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आत्तापर्यंत रस्त्यावरील अपघातांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या समोर आलेल्या अपघातात तरुणाला रस्त्यावर फुटबॉल खेळणं महागात पडल्याचं दिसून आलं. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही मुलं रस्त्यावर फुटबॉल खेळत आहेत. रस्त्यावर वाहने येत-जात नसल्याने तरुणांनी इथे फुटबॉलचा खेळ रंगवला आहे. पण खेळता खेळता त्यातील एका तरुणासोबत धक्कायक घडल्याचं पहायला मिळालं. एक मुलगा फुटबॉल खेळताना नाल्यात पडला. मुलाचा पाय नाल्यात गेल्याने तो स्वतःचा तोल सांभाळू शकला नाही आणि जोरात तो नाल्यात पडला. तो लगेच नाल्यातून बाहेर पडला, पण पुढे जातना त्याचा पाय पुन्हा दुसऱ्या नाल्यात गेला आणि तो पुन्हा खाली पडला. मुलांच्या फुटबॉल खेळतानाचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

@IliveDo नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १२ सेकंदांच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून रस्त्यावर असं खेळणं योग्य नसल्यातं नेटकरी म्हणत आहेत. काहींना हे पाहून हसूनही आवरलं नाही. त्यामुळे व्हिडीओवर एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात

दरम्यान, लोकांना रस्त्यावर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. समोर मागे, उजवीकडे डावीकडे लक्ष ठेवा, सांगितलं जातं. कारण ‘मृत्यू’ कधी आणि कुठुन येईल किंवा अपघात होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आजकाल वेगवान वाहने रस्त्यांवर उच्छाद मांडत आहेत. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात